वर्धेचे नवे पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर

0
343

वर्धेचे नवे पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर

अनंता वायसे

वर्धा : राज्याच्या गृह विभागाने २२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे काल सांयकाळी १७ सप्टेंबर रोजी आदेश पारीत केले. वर्धेचे पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांचे जागेवर प्रशांत होळकर यांची बदली करण्यात आली आहे .
प्रंशात होळकर सध्या अमरावती येथे पोलीस उपायुक्त (मुख्यालय) पदावर कार्यरत आहे .यापुर्वी मुंबई मध्ये राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त पदावरुन त्यांची बदली अमरावती येथे झाली होती , वाशीम येथे २०१६ पोलीस अधिक्षक म्हणुन कार्यभार सांभाळला.
पुर्व विदर्भात पाच जिल्यांचे तर पश्चिम विदर्भात दोन जिल्ह्यातील पोलीस अधिक्षकांच्या पदस्थापनेचे आदेश पारीत झाले . पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांचे सह अनेक अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पदस्थापनेचे आदेश काढण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here