राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

0
660

राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

वंचित बहुजन आघाडी शाखा राजुरा तर्फे आयोजन

 

राजुरा (चंद्रपूर) : राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताचे औचित्य साधून त्यांना विनम्र अभिवादन करण्याच्या उदात्त हेतूने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन वंचित बहुजन आघाडी शाखा राजुराचे वतीने करण्यात आले आहे.

रक्तदान सर्व श्रेष्ठ दान आहे. गरजूंना व रुग्णांचे प्राण वाचवून त्यांना जीवनदान देण्याच्या संकल्पने तुन येत्या 14 एप्रिल ला भिमजयंती दिनी छत्रपती शिवाजी महाराज संकुल, सुपर मार्केट, असिफाबाद रोड राजुरा येथे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य रक्तदान शिबिराचे उदघाटन सकाळी 10 वाजत्या नियोजित स्थळी वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या हस्ते पार पडणार आहे.

या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना ताक, लस्सी, शरबत वाटप करण्यात येणार आहे. सदर शिबिरात सहपरिवार रक्तदान करून रक्तदानाने लोकांचे प्राण वाचविण्यास सहकार्य करण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी तथा या शिबिराचे मुख्य संयोजक प्रमुख अमोल राऊत यांनी केले आहे. रक्तदात्यांनी 8888832397 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आयोजकांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here