नियमबाह्य उमेदवारांना नोकरी देणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करा

0
395
नियमबाह्य उमेदवारांना नोकरी देणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करा 
ऊर्जामंत्र्यांनी चौकशी समिती गठीत करण्याचे दिले आश्वासन
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची विधानसभेत मागणी 
चंद्रपूर :  येथील महाऔष्णिक विद्युत केंद्रामध्ये प्रकल्प सुरु होऊन ४० वर्षे झालीत. यात हजारो प्रकल्पग्रस्त नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु गैर प्रकल्पग्रस्तांना आर्थिक देवाण घेवाण करून प्रकल्पग्रस्त म्हणून दाखविल्याची बाब गंभीर असून यावर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विधानसभेत केली. याची दखल घेत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विभागीय समिती गठीत करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करणार असल्याचे उत्तरात सांगितले आहे.
प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळण्यासाठी खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर हे नेहमी आग्रही आहेत. परंतु सि. टी. पी. एस च्या आस्थापना विभागात कार्यरत असलेले अधिकारी प्रकल्पग्रस्तांच्या नावावर गैर प्रकल्पग्रस्तांची प्रशिक्षणार्थी म्हणून भरती करीत असल्याच्या तक्रारी आल्या. आर्थिक साटेलोटे करीत मूळ जमीन मालकाच्या नावावर वारसदार म्हणून खोटी कागदपत्रे बनवून गैर प्रकल्पग्रस्तांची प्रकल्पग्रस्त म्हणून निवड केली आहे. अशा तक्रारी मूळ प्रकल्पग्रस्तांनी केल्या आहेत. यात सहाय्यक महाव्यवस्थापक अरविंद वानखेडे व पुनर्वसन विभागाची प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखविल्याचे निदर्शनास येत आहे.
त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून यावर मंत्री महोदयांनी स्वतः लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विधान भवनात केली. याची दखल घेत मंत्री महोदयांनी विभागीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. हि चौकशी झाल्यास दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होऊन मोठा घोटाळा समोर येणार असून जे मूळ प्रकल्पग्रस्त आहेत. त्यांना नोकरीवर सामावून घेता येऊन त्यांना न्याय देण्यात येणार असल्याचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले.
यावेळी बोलताना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात कुशल, अकुशल कामगार मागील १० वर्षांपासून काम करीत असून त्यांच्या नोकरीच्या प्रश्न महत्वाचा आहे. त्यांना तात्काळ नोकरी लावण्याबाबत सकारात्मक पाऊले उचलण्याची मागणी यावेळी केली. उत्तर देताना ऊर्जा राज्यमंत्री यांनी याबाबत बैठक लावण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here