राजकीय पक्षांचे शिलेदार बनले अवैध वाळुचे ठेकेदार

0
529

राजकीय पक्षांचे शिलेदार बनले अवैध वाळुचे ठेकेदार

रात्री चोर दिवसा साव बनुन वावरतात गावोगा

उमा अंधारी, वैनगंगा चे पात्र ठरले अवैध वाळू तस्करांचे कुरण

अवैध वाळू चा फर्दाफाश भाग १

अविनाश कुमार वाळके

पोंभुर्णा तालुका नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला आहे.या परीसरात डोंगर दर्या,नद्या असे नैसर्गिक नजारा लाभलेला असुन या नैसर्गिक साधन संपत्ती कडे आता राजकारण्यांची नजर लागली आहे.उमा, अंधारी,व वैनगंगा या नद्यांचे खोरे या तालुक्याला लाभले आहे.या खोर्यात बहुमुल्य अशी वाळु आहे या वाळुवर आता तस्करांची नजर पळली आहे.पोंभुर्णा तालुक्यात वाळुला जास्त भाव मिळत असल्याने येथील तथाकथित राजकीय पक्षांचे शिलेदार हे आता या बहुमुल्य अवैध वाळू चे ठेकेदार झाले आहेत.दिवसा पांढरा शुभ्र वस्त्र परिधान करायच व रात्रो मात्र वाळु तस्करी चे काळे धंदे करायचे हा त्या तथाकथित राजकीय पक्षांच्या शिलेदारांचे रोजचे काम झाले आहे.

पोंभुर्णा तालुक्यातील रेतीघाटाचे लिलाव झालेले नाहीत. बांधकाम करणाऱ्यांना छुप्या मार्गाने, वाढीव दरात रेतीचा पुरवठा केला जात आहे. तालुक्यात रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणारे रेतीमाफिया शासनाचे उत्पन्न बुडवत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील थेरगाव,आष्टा,सेल्लुर,वेळवा, येथून अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. रेतीतस्करांनी थेट नदीपात्रात,नालापात्रात ट्रॅक्टर उतरविण्यासाठी रस्ते तयार केले आहेत.
तालुक्यातील आष्टा या नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन राजरोसपणे सुरु असून कोरोणा काळात प्रशासन व्यस्त असल्याचे फायदा घेत अवैध वाहतूक स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी व पोलीस प्रशासनासमोर होत असल्याचे चित्र दिसून येत आहेत.
तालुक्यातील रेतीघाटाचे लिलाव झालेले नाहीत. बांधकाम करणाऱ्यांना छुप्या मार्गाने, वाढीव दरात रेतीचा पुरवठा केला जात आहे. तालुक्यात रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणारे रेतीमाफिया शासनाचे उत्पन्न बुडवत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील आष्टा, थेरगाव व मोहाळा येथून अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. रेतीतस्करांनी थेट नदीपात्रात ट्रॅक्टर उतरविण्यासाठी रस्ते तयार केले आहेत.
रेतीमाफिया अवैध रेतीचा साठा करून दामदुप्पट भावात विकत असतात. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी घेतली जात आहे. गर्दी टाळण्यासाठी शक्य तेवढ्या उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांनाही घराबाहेर पडू दिल्या जात नाही. हीच संधी रेतीमाफियांनी हेरली आहे. सर्व प्रमुख मार्गावरून मनमर्जीने अवैध रेतीचे परिवहन सुरु आहे. अनेक शासकीय कर्मचारी बघ्याच्या भूमिकेत आहेत. तालुक्यातील आष्टा,मोहाळा,थेरगाव,जुनगाव,देवाळा,वेळवा,सेल्लुर येथून अवैधपणे रेतीचीउचल केली जात आहे. अवैध उत्खनन व वाहतुकीला तहसीलदारांनी आळा घालणे आवश्यक आहे.

ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करून नदीतून शेकडो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन व चोरी सर्रासपणे सुरु आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर व ट्रॉलीने आष्टा,मोहाळा,सेलुर,वेळवा, थेरगाव,जुनगाव,देवाळा,व परिसरातील खासगी व शासकीय बांधकामांना सर्रासपणे रेती पुरविली जात असते. ही अवैध वाहने पोलीस स्टेशनसमोरून जात असतात. अंधारी व उमा नदीघाट रेतीमाफियांसाठी तस्करीचे कुरण बनले आहे. परिसरात रेतीमाफियांची मोठी टोळी असून ते प्रशासन व्यस्त असल्याचा फायदा घेत आहेत. आष्टा नदि घाटावर रात्रभर विनाक्रमांकाच्या ट्रॉलीसह, ट्रॅक्टरची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते.
यात पोंभुर्णा तालुक्यातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या रेतीची तस्करी करतात यावर मात्र प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होताना दिसुन येत नाही. रात्रभर हे राजकीय पक्षांचे शिलेदार फिरत असतात कोरोणा महामारीने संपुर्ण चंद्रपुर जिल्ह्यात हाहाकार माजला आहे पन पोंभुर्णा तालुक्यात मात्र रेती तस्करांना खुली सुट दिल्याचे दिसून येत आहे.यावर वेळीच आळा घातला जावा व शासनाच्या करोडो रुपयांचा महसूल वाचविण्यात यावा अशी मागणी तालुका वासियांकडुन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here