अकोल्यात राबवणार देशाला दिशादर्शक “शेतकरी पॅटर्न”… नाही होणार शेतकरी आत्महत्या… प्रा.काशिराम वंजारी.

0
399

ज्ञानेश्वर गायकर पाटील.

नैसर्गिक आपत्ती बरोबर शेती मालाला बाजार भाव हमी नसल्याने , महागडी खते, औषधे यांच्या न परवडणाऱ्या किमती न परवडणारी शेती पुन्हा एकदा शाश्वत करण्याची जबाबदारी ओबीसी चेंबर द्वारा अकोले पॅटर्न राबून करणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा ओबीसी चेंबर चे अध्यक्ष अर्थतज्ञ प्राध्यापक काशिराम वंजारी यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत केली.

अकोले पॅटर्न बाबत बोलताना त्यांनी सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात शेतकरी कृषी कंपनी स्थापन करण्यात येत असून, लवकरच तिचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , कृषी मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत केले जाईल. या कंपनी मार्फत शेतकरी शेती बरोबर उद्दोजक बनवणार असून, शेती चे उत्पादन मध्ये समृध्द शेती माध्यमातून ३०% उत्पादन वाढ खात्रीने करणार असल्याचे ते म्हणाले. शेतकरी उत्पादक कंपनी शेती पूरक व्यवसाय निर्मिती करणार असून, स्वतः कंपनीचा मोठा प्रकल्प चेंबर च्या सहकार्याने उभा राहणार आहे. या कंपनीचा उद्देश कोरडवाहू , अल्प भूधारक शेतकरी यांचे जीवनमान उंचावण्यासाठी असून सर्वांना समान वाटा या न्यायाने ही कंपनी काम करेल. सुरवातीला प्रतेक शेतकरी सभासद यांना एक शेअर दिला जाईल. एका पेक्षा अधिक शेअर कुणाला ही मिळणार नाही. अंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान शेतकरी उत्पादन वाढीस मदत करण्या करिता कॅनडा येथील तंत्रज्ञान कंपनी बरोबर चेंबर ने बोलणी केली असून, जागतिक बँकेच्या साह्याने अकोल्यातील ही कंपनी उभी राहणार आहे. प्रतेक शेतकरी सभासद यांना महिन्याला किमान दोन हजार रुपये दर महा मिळतील अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली आहे.

अकोले पॅटर्न हा देशाला व शेतकरी वर्गाला दिशा देणारा ठरणार आहे. गांडूळ खत निर्मिती मधून शेती चे काय फायदे असतात याचे ही विश्लेषण त्यांनी केले. समृध्दी शेती बाबत त्यांनी तेलबियासंशोधन बाबत अधिक माहिती देऊन , देशाचा विकास या प्रकल्पातून कसा साधला जाईल या बाबत राज्यात तीन हजार लाकडी तेल घाना प्रकल्प उभारणी चालू असल्याची माहिती दिली. सर्वांना परवडणारे शुद्ध व नैसर्गिक खाद्य तेल प्रकल्प विदर्भातील 11 जिल्ह्यात चालू असून , लवकरच ते अन्य जिल्ह्यात अनुदाना सह चालू होतील. यातून मोठी रोजगार निर्मिती होणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

या पत्रकार परिषदेस चेंबर चे उपअध्यक्ष नारायणसिंग साबळे सह सर्व संचालक व जिल्हा समन्वयक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here