स्वच्छतागृह ठरले लोकप्रतिनिधींच्या अनास्थेचे फलित

0
976

स्वच्छतागृह ठरले लोकप्रतिनिधींच्या अनास्थेचे फलित

● प्रवाशांची उडतेय तारांबळ
● कोठारी राष्ट्रीय महामार्गावरील गंभीर बाब

स्थानिक बसस्थानक

कोठारी, राज जुनघरे
बल्लारश्शा बामणी ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम जोमात पुर्णत्वास आले. मात्र येथील महत्वपूर्ण कामाला बगल देत बांधकाम कंम्पणीने आपला गाशा गुंडाळून पळ काढला. राष्ट्रीय महामार्गावरील मार्ग रूंदीकरणात सदरच्या मार्गावरील गावागावांतील बसस्थानक परिसरातील स्वच्छतागृह महामार्गाने गिळंकृत केल्याने लोकप्रतिनिधींच्या अणास्थेचे फलित उघड झाले आहे. स्वच्छतागृह ही आवश्यक बाब असून स्थानिक प्रशासनावर प्रवाशांनी ठपका ठेवला असून या ज्वलंत समस्येंमुळे कोठारीकरांची अस्मिता वेशीला टांगली आहे.

येथिल बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानिक ग्रामपंचायतीने स्वच्छतागृह तयार केले होते. बामणी ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू झाल्याने सदर स्वच्छतागृह नामशेष झाले. इतकेच नाही तर या राष्ट्रीय महामार्गावरील अनेक स्वच्छतागृहे नष्ट झाली आहेत. बसस्थानक परिसरात स्वच्छतागृहाची मुलभूत गरज आहे. परंतु सदर कंपनीने महामार्गाचे बांधकाम संपुष्टात आले असले तरी स्वच्छतागृहे उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे. बामणी ते आष्टी महामार्गाचे बांधकाम संपुष्टात येवून जवळपास सहामहीन्याचा काळ लोटला आहे. कोठारी हे बल्लारपूर तालुक्यातील मोठे महसुली गाव असून तालूका निर्मिती चा प्रस्ताव शासन दरबारी जिल्याचे माजी पालक मंत्री व राज्याचे माजी अर्थमंत्री तथा नियोजन मंत्री यांनी स्थानिकांना आश्वासन देत सादर केलेला आहे. अशा गावाच्या तुलनेत प्रशासन तथा लोक प्रतिनिधींवर खापर प्रवाशी तथा नागरिक फोडू लागले आहेत.

कोठारी गाव हे महामार्गावरील अहेरी, आल्लापल्ली, सिरोंचा, आष्टी, गोंडपिपरी, बल्लारपूर, चंद्रपूर व नागपूर हया राज्याच्या उपराजधानी कडे जाण्याचा मार्ग आहे. दैनंदिन असंख्य प्रवाशांची वर्दळ असते. कोठारी गाव किमान ३० ते ३५ गावांची मुख्य बाजारपेठ आहे. बाहेर गावावरून येणारे प्रवाशी येथे थांबतात. अशा परिस्थितीत स्वच्छतागृह हे नितांत गरजेचे आहे. स्वच्छतागृह नसल्याने महिला, पुरुष व विद्यार्थी, आबाल वृद्ध, बालकांना अडचण निर्माण होत असुन लघूशंकेसाठी कुठेतरी आडोशाला धावपळ करावी लागते. यात महिलांची, शाळकरी मुलींची, प्रवाशांची कुचंबणा होत असते. “गाव मोठे पण दर्शन खोटे” विकासाच्या बाबतीत पाचवीला पुजलेले गाव या साधारण समस्येवर निर्णय घेण्यासाठी अग्रेसर नाही ही शोकांतिका आहे. साधारण मृत्रविसरजनाची तरतूद स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन करु शकत नाही ही कोठारीकरांच्या अस्मितेला धक्का पोहचविणारी आहे. राष्ट्रीय महामार्गावरील महानतेचे गाव एका कुचंबणेतून लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या अनास्थेमुळे विटंबनेचे माहेरघर ठरत आहे.

स्थानिक ग्रामपंचायत

बांधकाम कंम्पचे ते काम
बामणी ते आष्टी राष्ट्रीय महामार्गाचे काम करीत असतांना संबंधित कंपनीने मार्ग रुदीकरणात नष्ट झालेले स्वच्छतागृह बस स्थानक परिसरात पुनश्च निर्माण करणे अनिवार्य होते. आणी स्थानिक प्रशासन व जनप्रतिनिधी यांनी पाठपुरावा करून आग्रही भूमिका मांडणे गरजेचे असताना संबंधित कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून नविन स्वच्छतागृहाचा खर्च स्थानिक प्रशासनावर लादलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here