रुग्णांच्या सोयीसाठी कोरोनाबाबच्या उपाययोजनांची माहिती देणारे अद्यावत माहिती केंद्र सुरु करावे – आ. किशोर जोरगेवार

0
408

रुग्णांच्या सोयीसाठी कोरोनाबाबच्या उपाययोजनांची माहिती देणारे अद्यावत माहिती केंद्र सुरु करावे – आ. किशोर जोरगेवार

झुम मिटींगमध्ये आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मागणी

आरोग्य मंत्री यांनी चंद्रपुरात बैठक घ्यावी, आमदार किशोर जोरगेवार यांची मागणी

आरोग्य मंत्री यांनी मागणी केली मान्य

चंद्रपूरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणीक वाढत आहे. या परिस्थीतीचा आढावा घेण्यासाठी काल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या प्रमूख उपस्थितीत झुम मिंटीगचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्ह्यातील लोकप्रतिनीधी, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता, आयएमएचे अध्यक्ष आदिंची उपस्थिती होती. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी कोवीड संदर्भात चंद्रपूरातील परिस्थीतीची माहिती देत अनेक मागण्या केल्या. कोरोनाबाबत माहिती अभावी रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे याबाबत अचूक माहिती देणारे अद्यावत माहिती केंद्र सुरु करावे या केंद्राच्या माध्यमातून कोरोना रुग्णालयांची नावे, हेल्पलाईन नंबर, उपलब्ध रुग्णवाहिकांची माहिती, बेड उपलब्ध असलेल्या रुग्णालयांची माहिती यासह इतर माहिती नागरिकांना पुरविण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.

तसेच चंद्रपूरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तुम्ही स्वत: चंद्रपूरात बैठक घ्यावी अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना केली. ना. राजेश टोपे यांनीही मागणी मान्य करत पूढील आठवडयात चंद्रपूरात बैठक घेण्याचे मान्य केले.

चंद्रपूरातील कोरोना परिस्थिचा आढावा घेण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विडिओ कॅन्फरंसींगद्वारे संवाद साधला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरातील परिस्थितीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना अवगत करत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या सोयीच्या दृष्टीकोणातून अनेक महत्वाच्या मागण्या केल्यात. कोविड – १९ चा उपचार घेत असलेल्या रुग्णांबाबत रुग्णांच्या नांतगामध्ये संभ्रम आहे. तो दुर करण्यासाठी कोविड सेंटरमध्ये सिसिटिव्ही कॅमेरे लावण्यात यावे, कोरोना बाधित रुग्णाला त्याचा अहवाल दाखविण्यात यावा, आरटीपिसीआर चाचण्या वाढविण्यात याव्यात. रुग्णांना योग्य वेळी योग्य माहिती देण्यासाठी माहिती केंद्र सुरु करण्यात यावे, या केद्रांच्या माध्यमातून रुग्णवाहीका, रुग्णालयातील परिस्थितीत याबाबत रुग्णांची अचूक माहिती पूरविण्यात यावी, नागरिकांमधील कोरोनाबाबतचा गैरसमज दुर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी, डॉक्टरांची संख्या वाढविण्यात यावी, रुग्णवाहीका कमी पडत असल्यास पर्याय म्हणून योग्य तपासणी करुन स्कूल बसेस व खाजगी वाहणांना रुग्णवाहीकेची तात्पूर्त्या स्वरुपाची परवाणगी देण्यात यावी, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कोरोना संक्रमित रुग्णांना मोफत उपचार देण्यात यावे, कोरोना निदान लॅबची संख्या वाढवा, अशा विविध मागण्या या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना केल्यात. तसेच चंद्रपूरात आरोग्य मंत्री म्हणून आपण स्वत: बैठक घ्यावी अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. यावर सकारात्मक प्रतिक्रीया देत ना. राजेश टोपे यांनी पूढील आठवड्यात बैठक घेण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आता आरोग्य मंत्रीच चंद्रपुरात बैठक घेणार असल्याने आरोग्य व्यवस्थेत सुधारणा होईल अशी अशा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here