नगर परिषद राजुरा तथा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा -2022

0
556

नगर परिषद राजुरा तथा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा -2022

 

28/01/2022

स्वच्छ सर्वेक्षण 2022 तथा आजादी का अमृत महोत्सव निमित्य नगर परिषद राजुरा व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रश्‍नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राजुरा शहरातील विविध शाळामधील गट क्रमांक- 1 वर्ग 1 ते 4 मधील 26 विध्यार्थी व गट क्रमांक – 2 वर्ग 5 ते 10 वी मधील 15 विध्यार्थी असे एकूण 41 विध्यार्थी सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद हॉल, राजुरा येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेकरिता पर्यवेक्षक म्हणून ज्ञानेश सोनवणे, अश्विन कुमार भोई, संकेत नंदवंशी, आदित्य खापाने , प्रीतम खडसे , यांनी काम बघितले. यावेळी बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नेफडो, विजय जांभुळकर , चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष, संतोष देरकर राजुरा तालुका अध्यक्ष, संदीप आदे, राजुरा शहर अध्यक्ष, तालुका संघटक मनोज तेलीवार, सुनैना तांबेकर, आशिष करमरकर, संदीप पोगला, अभिनंदन काळे, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता नगर परिषद राजुराचे कर्मचारी व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या सभासदानी अथक परिश्रम घेतले. तसेच देशभक्तीपर वेशभूषा व डायलॉग स्पर्धा आणी प्रश्नमंजुषा स्पर्धा यांचे बक्षीस वितरण दि. 31 जानेवारी 2022 ला नगर परिषद कार्यालय राजुरा येथील सभागृहात सकाळी अकरा वाजता होणार आहे. क्रमांकप्राप्त विध्यार्थीना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू तसेच सहभागी प्रत्येक विध्यार्थीना प्रमाणपत्र मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here