बंगलोरहून नागपूरला दुर्मिळ रक्त पोहोचवले…!

0
1486

बंगलोरहून नागपूरला दुर्मिळ रक्त पोहोचवले…!

 

अत्यंत दुर्मिळ A2B निगेटिव्ह रक्त नागपूर महाराष्ट्रातील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल रुग्ण उजेर सिंग सौद यांना बंगलोरहून नागपूरला विमानाने आणण्यात आले.

अत्यंत दुर्मिळ असलेल्या या रक्तासाठी रुग्णाला ३.४ दिवस वाट पाहावी लागली. चंद्रपूर येथील रक्त संयोजक रिंकू कुमरे यांनी अमित जैन यांना खूप प्रयत्नानंतर फोन करून या गटाच्या A2B निगेटिव्ह रक्ताची व्यवस्था करण्यास सांगितले.

अमित जैन यांनी बंगळुरू येथे उपस्थित असलेल्या या रक्तगटाचे दाते शंकर नारायण आणि मधु कालीराजन यांच्याशी संपर्क साधून रक्तदान करण्याचे आवाहन केले. शंकर नारायण आणि मधु कालीराजन यांनी तात्काळ अर्ध्या तासात लायन्स ब्लड बँक बेंगळुरू गाठून रक्तदान केले.

त्यानंतर कार्गो सेवेद्वारे हे रक्त बंगळुरूहून नागपूरला पाठवण्यात आले. चंद्रपूरच्या रिंकू कुमरे आणि सरस्वती सौद यांनी रुग्णाला रक्त पोहोचवून रुग्णाचे प्राण वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

या प्रकरणात लायन्स ब्लड बँकेच्या सूरजचेही विशेष सहकार्य लाभले. रुग्णाच्या नातेवाइकांनी रक्तपुरवठा करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे व रक्तदात्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here