नर्सरी लगत नाल्यातून रेतीची सर्रास तस्करी ; वनविभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष

0
661

नर्सरी लगत नाल्यातून रेतीची सर्रास तस्करी ; वनविभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष

 

राजुरा, 27 डिसें. : राजुरा शहरालगत असलेल्या नर्सरी जवळील नाल्यातील रेतीची तस्करी होत असताना वनविभाग मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. बांधकामासाठी महत्वाची असलेली रेतीला सध्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने रेती चोरट्यांनी आपला मोर्चा रेती तस्करीकडे वळविला आहे.

राजुरा तालुक्यात सध्या रेती तस्करीच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याला जबाबदार प्रशासनाची उदासीनता असल्याचे नाकारता येत नाही. प्रशासनातीलच काही खिसेभरू अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लालसेपोटी रेती चोरटे चांगलेच धस्तावले असल्याचे एकंदरीत चित्र पहावयास मिळत आहे.

डोळ्यादेखत होत असलेली रेती तस्करी वन विभागाच्या निदर्शनास न येणे ही बाब पचनी पडण्यासारखी नाही. शासकीय महसूल बुडवत व पर्यावरणाला हानी पोहचवत वनविभागातील नाल्यातून रेतीची सर्रास तस्करी होत आहे. याकडे तालुका वन अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here