महात्मा गांधी विद्यालय नांदगाव (सुर्या) येथे मँराथान स्पर्धा संपन्न

0
395

महात्मा गांधी विद्यालय नांदगाव (सुर्या) येथे मँराथान स्पर्धा संपन्न

 

कवठाळा, नितेश शेंडे : महात्मा गांधी विद्यालय नांदगाव (सुर्या) येथे नुकतेच मँराथान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा दोन गटात संपन्न झाली. या स्पर्धेला उद्घाटक म्हणुन ग्रामपंचायत कवठाळा चे सरपंच नरेश सातपुते, नांदगाव चे सरपंंच विजय निखाडे उपस्थित होते.

मॅरेथॉन स्पर्धेत मुलींचा गटात प्रथम क्रमांक वैशाली मडावी, द्वितीय आचल देवतळे, तृतीय तृप्ती जुनघरी मुलांच्या गटात प्रथम क्रमांक रोहित गिणगुले, द्वितीय भुषन कोल्हेकर, तृतिय मोहनदास पिंपळशेंडे यांनी प्राप्त केला. विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक साईनाथ मेश्राम होते. कार्यक्रमाचे संचालन अनिल तेलसे यांनी तर आभार शामकांत पिंपळकर यांनी मानले. यशस्वीते साठी विजय डाहुले, गिता वाकळे, संजय थेरे, मनोहर चौधरी यांनी सहकार्य केले. स्पर्धेत १३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here