सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा

0
382

सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा

● वृक्षारोपण, दिव्यांगांना ब्लँकेट वाटप, कोविड -19 मध्ये मृत पावलेल्या पालकांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

● नेफडो व छ. शिवाजी महाराज बालोद्यान देखरेख समितीचे संयुक्त आयोजन

 

राजुरा, 18 डिसेंबर : नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा चे सर्वानंद वाघमारे, तालुका संघटक तथा माजी सरपंच, उप सरपंच व विद्यमान सदस्य, ग्राम पंचायत, बामणवाडा तसेच शहर संघटिका किरण हेडाऊ, उज्वला जयपूरकर, नगरसेविका, नगर परिषद, राजुरा सोबतच अजिंक्य जयपूरकर व महेश कोल्हापुरे यांचा वाढदिवस वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज बालोद्यान तक्षशिला नगर बामणवाडा येथे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था आणि छत्रपती शिवाजी महाराज बालोद्यान देखरेख समितीच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विजयकुमार जांभूळकर हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत बामणवाडा चे सचिव दत्ता कवठाळकर, बालोद्यान देखरेख समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते कीर्तीराव सुखदेवे यांची उपस्थित होती.
कोविड -19 मुळे मृत पावलेल्या आई, वडिल त्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य भेट, अंध दिव्यांगाना ब्लेंकट भेट व बालोद्यान परिसरात वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मसुद अहमद, अमरदीप वनकर, अल्का सदावर्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक बक्षी यांनी केले. प्रास्ताविक बादल बेले, नागपूर विभाग अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांनी तर आभार प्रदर्शन मेघराज उपरे यांनी केले. यावेळी उपक्रम स्थळी सुभाष धोटे आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र राजुरा, अरुण धोटे नगराध्यक्ष नगर परिषद राजुरा, अविनाश जाधव, माजी जी. प. सदस्य, कविता उपरे, तालुका अध्यक्ष महिला काँग्रेस कमेटी तसेच अनेक मान्यवारांनी भेट देऊन सर्व उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here