केंद्र शासनाचे अपयश चव्हाट्यावर आणत त्याविरोधात संघर्षाची भूमीका घ्या- कांग्रेस जिल्हाध्यक्ष महेन्द्र ब्रम्हाणवाडे यांचे आवाहन

0
407

केंद्र शासनाचे अपयश चव्हाट्यावर आणत त्याविरोधात संघर्षाची भूमीका घ्या- कांग्रेस जिल्हाध्यक्ष महेन्द्र ब्रम्हाणवाडे यांचे आवाहन

 

कूरखेडा/गडचिरोली, सुखसागर झाडे
केंद्राचे मोदी सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरलेले आहे. देशाचा जिडीपी दर कमालीचा घसरलेला आहे. बेरोजगारी मूळे सुशिक्षित युवक वर्गात नैराश्य निर्माण झाले आहे. इंधना सह सर्वच जिवनावश्यक वस्तूंचे दर आकाशाला भीडलेले आहे. मात्र मोदी सरकार स्वतःचीच पाठ थोपटत आहे हे केंद्र शासनाचे अपयश चव्हाट्यावर आणत त्याविरोधात संघर्षाची भूमीका घेत रस्त्यावर उतरा असे आवाहन कांग्रेस जिलाध्यक्ष महेन्द्र ब्रम्हाणवाडे यानी केले.

कूरखेडा येथे आज बूधवार रोजी पेट्रोल डीजल घरगूती गॅस, खाद्यतेल यांचा दरवाढी विरोधात कांग्रेस पक्षाचा वतीने जनजागृति अभियानाची सूरवात येथील फव्वारा चौकात आयोजित कार्यक्रमातून करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ब्राम्हणवाडे बोलत होते. यावेळी शहरातील प्रमूख रस्त्यावरून महागाई विरोधात जनजागृति रॅलीचे आयोजन सूद्धा करण्यात आले होते. कार्यक्रमात कांग्रेस चे जिल्हा प्रभारी डॉ. एन डी कीरसान, माजी आमदार आनंदराव गेडाम, डॉ. नितीन कोडवते, किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष वामनराव सावसागडे, अनूसूचित जाति सेलचे जिल्हा अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, माजी जि प उपाध्यक्ष जिवन पाटील, गट कांग्रेस तालुका अध्यक्ष जयंत हरडे, यूवक कांग्रेस चे तालुका अध्यक्ष गिरीधर तितराम, वडसा यूवक कांग्रेस चे अध्यक्ष पिंटू बावणे, जि प सदस्य प्रभाकर तूलावी, जि प सदस्य प्रल्हाद कराडे, प स उपसभापति श्रीराम दूगा, माजी जि प सदस्य नंदू नरोटे, माजी नगराध्यक्ष आशाताई तूलावी, महीला कांग्रेस अध्यक्ष जयश्री धाबेकर, नगर सेवक उसमान खान, आसीफ शेख, आरमोरीचे नगर सेवक सूदाम मोटवानी, मीलींद खोबरागड़े, सूनिल चटगूलवार, प्रभाकर कूबडे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिवाकर मीसार, सिंधूताई तितीरमारे, आनंदराव जांभूळकर, ओबीसी आघाडीचे ता अध्यक्ष मनोहर लांजेवार, बबलू शेख व कांग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थीत होते. कार्यक्रमाचे संचालन प स सदस्य मनोज दूनेदार तर आभार प्रदर्शन यूवक कांग्रेसचे ता सचिव कपील पेंदाम यानी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here