गडचिरोली येथे मेडिकल कॉलेज मंजुर करा : आमदार डॉ. देवराव होळी

0
473

गडचिरोली येथे मेडिकल कॉलेज मंजुर करा : आमदार डॉ. देवराव होळी

वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचेशी मुंबई येथे गडचिरोली करिता नवीन मेडिकल कॉलेजबाबत केली चर्चा

 

गडचिरोली, सुखसागर झाडे
गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी गडचिरोली येथे नविन मेडिकल कॉलेज मंजुर करावे याकरिता वैदकिय शिक्षण मंत्री अमितजी देशमुख यांचेशी मुंबई येथे चर्चा करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पीपरे प्रामुख्याने उपस्थित होते.

गडचिरोली जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून मेडिकल कॉलेज मंजुर करावे अशी जिल्हा वासियांची मागणी आहे. राज्य सरकारने गडचिरोली येथे लवकरच मेडीकल कॉलेजला मंजूर करण्यात येईल असे आश्वासन दिले मात्र अजूनपर्यंत मंजुरी मिळाली नाही त्यामुळे जिल्हा वासियांची घोर निराशा झालेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन गडचिरोली येथे नवीन मेडिकल कॉलेज मंजुर करावे अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचेकडे केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here