ब्रह्मपुरी येथे मेकअप स्टुडिओचा शुभारंभ

0
492

ब्रह्मपुरी येथे मेकअप स्टुडिओचा शुभारंभ

ब्रह्मपुरी येथे प्रथमच तृप्ती’s ब्रायडल अकॅडमी मार्फत मेकअप स्टुडिओचे शुभारंभ करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मॉडेल तथा ॲक्ट्रेस रूची शर्मा यांनी स्वतःचे प्रेझेंटेशन सादर करुन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून संचालिका तृप्ती माणिक मेश्राम यांनी रुची शर्मा यांचे वर सभ्यसांची लूक चे प्रात्यक्षिक करून आपली मेकअप क्वालिटी उपस्थित मान्यवरांसमोर दाखविली. यावेळी उपस्थित मान्यवरांना रूची शर्मा व संचालिका तृप्ती मेश्राम यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.

या ॲकॅडमी चे उद्घाटन ब्रम्हपुरी नगर परिषद च्या नगराध्यक्षा रीताताई उराडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी नगरसेविका सुनीता तिडके, सहसंचालिका सर्वोदय हॉस्पिटलच्या डॉक्टर स्नेहा जयंत पर्वते, डॉक्टर प्राची मिलिंद शिंदे, वंदनाताई बुरले आदी सर्व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन तथा प्रस्तावना अकॅडमीच्या संचालिका तृप्ती माणिक मेश्राम यांनी केले. प्रस्तावनेत त्यांनी सांगितले की मागील 28 वर्ष या क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने इंडियन ब्युटी अवॉर्ड, स्टार ब्युटी अवॉर्ड, मराठी साहित्य संमेलन अवॉर्ड, सेलिब्रिटी मेकअप अवार्ड, मायथॉलॉजी मेकअप अवॉर्ड, बेस्ट ब्युटीशियन अवॉर्ड, बेस्ट सीनियर मेकअप डिग्री तथा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम प्रोफेशनल अचीवर अवार्ड इत्यादी अवार्ड ने सन्मानित करण्यात आले आहे.

आगामी टीव्ही वर सुरू होणारी इंडियाज बेस्ट मेकअप आर्टिस्ट रिऍलिटी शो मध्ये टीम लीडर म्हणून यांनी काम केले आहे. भारतभर अनेक सेमिनारमध्ये सिनियर प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट म्हणून आपल्या मेकअप क्वालिटी व कामाची ख्याती पसरली आहे. या मेकअप स्टुडिओमध्ये सेलिब्रिटी मेकअप, फॅन्टसी मेकअप, एअरगन मेकअप, पार्टी मेकअप, थ्रीडी लाईटेनिंग मेकअप, ब्रायडल व ग्रूम मेकअप, वॉटरप्रूफ मेकअप, प्रोस्थेटीक मेकअप, एचडी मेकअप इत्यादी मेकअप केले व शिकविले जातात असे तृप्ती यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मयूर मेश्राम, मंगेश मेश्राम, दिलीप ढोरे, अश्विन राऊत व निलेश फोटो स्टुडिओ यांनी सहकार्य केले.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here