चंद्रपूरातील समाजसेवक भूषण फूसे यांचा आंबेडकर भवन मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश…
चंद्रपूर जिल्हात गोर-गरिब पीड़ितासाठी रात्र-दिवस काम करीत असलेले भूषण फूसे यांनी श्रद्धेय आद. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व त्यांनी प्रत्येक समाजातील घटकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी संपूर्ण भारतभर चालवलेली चळवळ पाहता फूसे साहेब यांनी श्रद्धेय आद. बाळासाहेब आंबेडकर याचे हात बळकट करण्याच्या हेतूने आज दि.01/11/2021 ला पक्ष कार्यालय मुंबई येथे वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या प्रदेश अध्यक्षा आद. रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्ष प्रवेश केला.

त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रिय कार्याध्यक्ष भीमराव साहेब आंबेडकर ह्यांची भेट घेतली. साहेबांनी भूषण फुसे ह्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.