बल्लारपूर शहरातील अनेक नागरीकांचा श्री मंगल कार्यालयातील आम आदमी पक्षाचा नियोजनात्मक बैठकीत पक्षप्रवेश

0
165

बल्लारपूर शहरातील अनेक नागरीकांचा श्री मंगल कार्यालयातील आम आदमी पक्षाचा नियोजनात्मक बैठकीत पक्षप्रवेश

आम आदमी पार्टी बल्लारपुर शहरात होणाऱ्या आगामी नगरपरिषद निवडणुकीत संपूर्ण ताकदीने पूर्ण वॉर्ड नियोजित लढणार आहे. याचीच तयारी आणि कार्यकत्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याकरीता, दिनांक 31/10/2021 रविवार ला श्री मंगल कार्यालय इथे शहर संयोजक रविकुमार पूप्पलवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ता मेळावा आयोजित केला गेला. ज्यात शहरातील संपुर्ण वॉर्ड मधील जागरूक नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी बहुसंख्येनी सहभाग घेतला. ज्यात चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष सूनील देवराव मुसळे, जिल्हा कोषाध्यक्ष भीवराज सोनी, जिल्हा उपाध्यक्ष विजय सीद्धावार, जिल्हा विधि सल्लागार ऍड. किशोर पुसलवार, राजुरा विधानसभा संयोजक प्रदीप बोबडे, भद्रावती तालुका अध्यक्ष सोनल पाटिल, सचिव सुमित हस्तक यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी पार्टी प्रवेश केला. पार्टी प्रवेश कर्त्यांमध्ये GN कॉलेज चे माजी प्राचार्य डाॅ. चोकसे, सामजिक कार्यकर्ता पांड़े, मनीषा नगराळे, साखरकर, सतीश रोहनकर, सागर कांबळे,इत्यादी नागरीकानी पक्ष प्रवेश केला.

या कार्यक्रमात शहराध्यक्ष रविकुमार शं. पुप्पलवार, शहर उपाध्यक्ष अफज़ल अली आणि राकेश वडसकर, सचिव ऍड. पवन वैरागडे , शहर संघठन मंत्री नीलेश जाधव, शहर मीडिया प्रभारी आदर्श नारायणदास, महिला शहराध्यक्ष अलका वेले, उपाध्यक्ष शिला शिवनकर, सचिव ज्योति बाबरे, सह सचिव शीतल झाड़े, संघठन मंत्री किरण खन्ना, सुदाकर गेडाम, अवदेश तिवारी , समशेरसिह चौहान , सरिता गुजर , कृष्णा मिश्रा , सुमित ताकसांडे, प्रशांत गद्दाला , मीना केशकर, आशीष फुलझले, सलमा सिद्दिकी, सागर कांबळे, रवि गडमवार, आनंद चाहारे, जमीला अली, उमेश काकड़े, उमेश कडू, प्रणय मेश्राम, दुर्गा शेंडे, सोनम लाहोरे, स्नेहा गौर, नूरसबा सिद्दीकी, प्रानील गावंडे, इर्शाद अली, आशीष गेडाम, नेहा गुजर इत्यादि क्रांतिकारी मित्रांच्या सहयोग आणि योगदानाने कार्यक्रम संपन्न झाला.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here