राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करा – आमदार डॉ. देवरावजी होळी

0
429

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करा – आमदार डॉ. देवरावजी होळी

राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगारातील कर्मचाऱ्यांच्या संपाला दिली भेट

कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर

 

राज्य परिवहन महामंडळाचे विलीनीकरण राज्य शासनात करण्यात यावे या मागणीसाठी संपुर्ण राज्यासह गडचिरोली आगारातील कर्मचार्‍यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या बेमुदत संपाला आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी भेट देऊन आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर करीत सरकारने लवकरात लवकर राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे अशी मागणी केली आहे.

या आंदोलनप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, नगराध्यक्ष सौ योगिताताई पिपरे, पंचायत समितीचे उपसभापती विलासजी दशमुखे भाजपा महिला आघाडीच्या नेत्या प्रतिभाताई चौधरी यांचेसह परिवहन महामंडळाचे चालक वाहक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी वेतन- मानधन असून त्या आधारावर कर्मचाऱ्यांना या महागाईच्या काळात कौटुंबिक परिपंच पुर्ण करने व जीवन जगणे कठीण झाले आहे. दिवस-रात्र जागून शेकडो प्रवाशांना सुरक्षित रित्या पोहोचविणारे चालक -वाहक रात्र भर आगारात जागणारे कर्मचारी अत्यल्प मानधनावर सेवा देत आहेत. परंतू ते निमशासकीय कर्मचारी असल्याने त्यांना शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ देय नाही नियमित व योग्य वेतन नाही . त्यामुळे या परिवहन महामंडळाचे विलिनीकरण राज्य शासनात होणे आवश्यक आहे. तेव्हाच त्यांच्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनातील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शासनाचे सेवाशर्ती वेतन लागू होईल. त्यामुळे त्याचा फायदा राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातील परिवहन महामंडळाच्या शेकडो कुटुंबांना होईल. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने निर्णय घेऊन राज्य परिवहन महामंडळाचे विलीनीकरण राज्य शासनात करावे. अशी मागणी आंदोलनाच्या प्रसंगी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here