महाराष्ट्रातील पहिल्या शहर उपजीविका केंद्राचे भद्रावतीत लोकार्पण

0
388

महाराष्ट्रातील पहिल्या शहर उपजीविका केंद्राचे भद्रावतीत लोकार्पण

खासदार बाळू धानोरकर यांनी केले कामाचे कौतुक

 

चंद्रपूर : केंद्र सरकारने भद्रावती येथील कामाची दखल घेत ९ फेबुरवारी २०२१ ला शहर उपजीविका केंद्राच्या प्रस्तावाला मान्यता प्राप्त झाली. हि योजना केंद्र शासनाकडून २०१७ पासून जिल्हा स्तरावर राबविण्यात येत होती. तहसील स्तरावर व ब वर्ग नगर परिषद मध्ये महाराष्ट्रातून भद्रावती नगर परिषद ची प्रायोगिक तत्वावर मॉडल नगर परिषद म्हणून निवड करण्यात आली आहे. यासाठी दिल्लीवरून आलेल्या अभ्यासक टीमने याबाबत शासनांकडे शिफारस केली होती. आज खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते या केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. विशेष म्हणजे भद्रावती नगर परिषदेत ४५० बचत गट असून यामध्ये चार हजार महिला प्रत्यक्ष काम करतात. त्यामध्ये घंटागाडी व इतर कामांच्या समावेश आहे. या कामाची दखल केंद्र सरकारने घेतली. त्यामध्ये बीपीएल गटातील महिलांना पुरस्कार मिळाला होता. त्याकरिता नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी स्वखर्चातून त्यांना विमानाने दिल्ली येथे पाठविले होते.

 

यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर, भद्रावती नगर परिषद अनिल धानोरकर, भद्रावती नगर परिषद उपाध्यक्ष संतोष आमने, भद्रावती नगर परिषद मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर, भद्रावती नगर परिषद मुख्याधिकारी जगदीश गायकवाड, नगरसेवक तसेच नगरसेवकांची उपस्थिती होती.

खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, महिला वर्गास प्रोत्साहन देणे, त्यांच्या बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच नागरिकांना विविध उपयुक्त सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शहर उपजीविका केंद्राची संकल्पना राबविण्यात येत असून या माध्यमातून महिला आर्थिकद्रुड्या आत्मनिर्भर होणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

 

यावेळी आमदार प्रतिभाताई म्हणाल्या कि, शहरी उपजीविका केंद्राचा बचत गटांना वस्तू विक्री तसेच विविध सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी उपयोग होणार आहे. महिलांनी तयार केलेल्या उत्पादीत वस्तुंना बाजारपेठ मिळण्यासाठी हा उपक्रम राबविला आहे. त्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. महिला विविध कलेत पारंगत असतात. त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू करीता त्यांना हक्काची बाजारपेठ या माध्यमातून निर्माण झाली आहे. महिलांना पुढे देखील काही अडचण आल्यास त्यांच्यासोबत मी महिला आमदार म्हणून राहील असे प्रतिपादन त्यांनी केले.

 

या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर म्हणाले की, या नारीशक्ती शहरी उपजीविका केंद्राच्या माध्यमातून बचतगटांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हजारो कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार आहे. शहरातील नागरिकांना घरबसल्या घरगुती सेवा या केंद्राच्या माध्यमातून मिळणार आहे. तसेच शहरातील अनेक लहान-लहान असंघटित कामगारांना या केंद्राच्या माध्यमातून रोजगार मिळणार असल्याने उपजीविकासंबंधी समस्या सोडविण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना नगरपालिकेच्या अंतर्गत नारीशक्ती शहरी उपजीविका केंद्राच्या माध्यमातून होणार आहे. महिलांनी घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी शहरात महिला बचतगटांची स्थापना केली असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here