कोठारी येथे पारपडला छायाचित्रकारांच्या मैत्रीचा सोहळा

0
811

कोठारी येथे पारपडला छायाचित्रकारांच्या मैत्रीचा सोहळा

 

 

राज जुनघरे

कोठारी :- बल्लारपूर तालुक्यातील कोठारी तेथे महीपालसिंग बाबा टेकडी परिसरात चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ येथुन छायाचित्रकार, पत्रकार विविध समाजसेवींचा मैत्री सोहळा व मेळावा बल्लारपूर तालुका ग्रामीण छायाचित्रकार संघटना व छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ऑक्टोबर २०२१ रोजी पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रपूर बहुउद्देशीय छायाचित्रकार संस्थेचे अध्यक्ष नितीन रायपुरे उदघाटक म्हणून सोमेश्वर पदमगिरीवार उपसभापती पंचायत समिती बल्लारपूर, प्रमुख उपस्थिती मोरेश्वर लोहे, सरपंच ग्रामपंचायत कोठारी, जय वर्मा, कवी भट, प्रविण करोडे, गोलु बाराहाते, प्रमोद कातकर, आनंद गोंगले, अनिल विरुटकर, श्रीधर पा. मोरे, शिला गुरूनुले, जयकरण कश्यप व के. एम.रेड्डी, रवी भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमामध्ये छायाचित्र क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या विविध छायाचित्रकारांचा, समाजसेवकांचा, व राजकीय क्षेत्रातील व पत्रकार क्षेत्रात कार्यरत सेवाभावीका चा स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यात सोमेश्वर पदमगिरीवार, जय वर्मा, कवी भट, प्रविण कलोडे, गोलू बाराहाते, आनंद गोंगले, लोमेश जावलीकर, अनिल विरुटकर, श्रीधर पा.मोरे , शिला गुरूनुले, जयकरण कश्यप, के. राजु, संजय बानखेडे, सुशिला लोभाने, देवा बुरडकर, पत्रकार सुरेश रंगारी, राज जुनघरे, प्रमोद येरावार ,मदन नैताम, दिनेश गोवर्धन, केशीप पाटील, शंकर चक्रवर्ती, चंद्रपूर तालुका छायाचित्रकार संघटना, ब्रम्हपुरी तालुका छायाचित्रकार संघटना, नागभिळ तालुका छायाचित्रकार संघटना, मुल तालुका छायाचित्रकार संघटना, बल्लारपूर तालुका छायाचित्रकार संघटना, चिमुर तालुका छायाचित्रकार संघटना, भद्रावती तालुका छायाचित्रकार संघटना, गोंडपिपरी तालुका छायाचित्रकार संघटना, सिंदेवाही तालुका छायाचित्रकार संघटना, सावली तालुका छायाचित्रकार संघटना, गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, चामोर्शी तालुका छायाचित्रकार संघटना, यवतमाळ वणी तालुका छायाचित्रकार संघटना, वर्धा हिंगणघाट तालुका छायाचित्रकार संघटना आदी छायाचित्रकार संघटनांचा सत्कार स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

 

या कार्यक्रमामध्ये दिलिप लोनगाडगे यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पत्नी सुवर्णा लोणगाडगे व मुलांना एक लाख रुपये चा धनादेश छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांचे कडून प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन फुलचंद मेश्राम यांनी मानले, नितिन रायपुरे, सोमेश्वर पदमगिरीवार, आनंद गोंगले, मोरेश्वर लोहे यांची समायोजित भाषने झाली. सुत्र संचालन सुरेश रंगारी यांनी केले. याच कार्यक्रमामध्ये कोठारी पत्रकार बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून नितीन रायपुरे यांचा शाल श्रीफळ देऊन राज जुनघरे, सुरेश रंगारी, यांच्या वतीने गौरव करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात सन २००७ पासून उदयास आलेली छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था छायाचित्रकारांच्या समस्या, अडचणी दूर करण्यासाठी सतत कार्यरत असून ही संघटना चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या चार जिल्ह्यांत छायाचित्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी अविरत संघर्ष करीत आहे. यापुढे ही विदर्भातील छायाचित्रकारांना एकत्रित करून त्यांच्या हक्काच्या लढाई साठी कार्य करणार असल्याचे अध्यक्ष पदावरून बोलताना नितिन रायपुरे यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बल्लारपूर तालुका ग्रामीण छायाचित्रकार संघटनेचे विवेक रामटेके, शुभम बुटले, पंकज जावलिकर, बंडु देवतळे, कुणाल जावलीकर, प्रफुल जिवने, शैलेश बांबोडे, आकाश कांबळे, धम्मदिप दुर्योधन, राहुल देठे , अमोल बोथले आदीनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here