पेंढरी साजा क्र. २२ येथे तलाठी रुजू करा

0
417

पेंढरी साजा क्र. २२ येथे तलाठी रुजू करा

जि.प.सदस्य सह विविध पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले निवेदन

धानोरा/गडचिरोली, सुखसागर झाडे

धानोरा तालुक्यातील मौजा पेंढरी येथील पेंढरी साजा क्र. २२ येथे नविन तलाठी देणेबाबत, त्यातच ई पिक पाहणी ची समस्या दुर करण्याबाबत तहसिलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले. मौजा पेंढरी साजा क्र. २२ चे तलाठी यांची बदली झाल्याने नविन तलाठी अजून पर्यंत रूजू झाले नाही.

सदर क्षेत्रात धान विक्री ऑनलाईन प्रक्रिया करण्याची वेळ ३१ ऑक्टोंबर २०२१ असल्याने बऱ्याच मोठया प्रमाणात ई पिक पाहणी बाकी आहे, त्या अनुषंगाने भविष्यात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागू शकते. करिता या बाबींचा गंभीरपणे दखल घेऊन पेंढरी भागात नविन तलाठी किंवा पर्यायी व्यवस्था करून ई पिक पाहणी करून देण्यात यावी. जेणे करून अती दुर्गम भागातील शेतकऱ्यांना अडचण निर्माण होणार नाही. करीता गणवीर साहेब तहसिलदार धानोरा यांच्याकडे निवेदनातून मागणी केली आहे.

यावेळी निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे, जिल्हा परिषद सदस्य राजु जिवाणी, कामानगड चे सरपंच संजय गावडे, सामाजिक कार्यकर्ता परमेश्वर गावडे, जांभळी चे उपसरपंच पुरुषोत्तम बावणे, माजी सरपंच दुधमाळा उमेश किरको, प्रदीप उसेंडी जांभळी व भागातील शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here