शेतकरी लुटीचा आक्रोश ; रत्नाकर चटप यांची संतप्त भूमिका

0
561

शेतकरी लुटीचा आक्रोश ; रत्नाकर चटप यांची संतप्त भूमिका

 

कोरपना, नितेश शेंडे
नांदाफाटा : चंद्रपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची सरास लूट सुरू आहे. प्रत्येक पोत्यामागे १ किलो १०० ग्रॅम इतके वजन कपात करून काटामारी केली जात होती. यामागचे कारण विचारले असता पोत्याचे १ किलो वजन व बाजार समिती नियमानुसार १०० ग्रॅम असे मिळून १ किलो १०० ग्रॅम कपात केल्याचे मापारी यांनी सांगितले. त्यांनतर ही बाब बिलात लेखी नमुद करण्यास सांगितल्यानंतर टाळाटाळ करण्यात आली. हजारो क्विंटल सोयाबीन मागे दिवसभरात लाखो रुपयांची शेतकऱ्यांची लूट करण्यात आली होती. ही बाब संवेदनशील साहित्यिक व शांत स्वभावाचे धनी रत्नाकर चटप यांना लक्षात आल्यानंतर त्यांचा देखील राग अनावर झाला. अखेर त्यांनी आवाज उचलल्यानंतर उपस्थित सर्व शेतकऱ्यांना कपात केलेल्या पोत्यामगील १०० ग्रॅम वजनाचे पैसे परत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here