सोयाबीन मळणी करताना थ्रेशर मध्ये दबून शेतमजुराचा दुर्दैवी मृत्यू

0
885

ब्रेकिंग न्यूज

सोयाबीन मळणी करताना थ्रेशर मध्ये दबून शेतमजुराचा दुर्दैवी मृत्यू

 

राजुरा (१६ ऑक्टो.) : सोयाबीन पिकाची थ्रेशरच्या साहाय्याने मळणी करताना थ्रेशर मध्ये दबून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी तालुक्यातील गोयेगाव येथील शेत शिवारात घडली.

मधुकर ताजने यांच्या शेतात सोयाबीनची मळणी करताना चुकीने माथरा येथील रहिवासी शेतमजूर रामकिसन नारायण धोटे (४०) थ्रेशर मध्ये दबले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतकाच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here