राजुरा नेफडो च्या पदाधिकाऱ्यांनी वृक्षारोपन करून केला वाढदिवस साजरा
राजुरा/अमोल राऊत

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा तालूकाच्या पदाधीकार्यांनि आसीफाबाद रोड रेल्वे क्रोसिँग कडील परिसरात व्रूक्षारोपन करून वाढदिवस साजरा केला.
तालुका संघटक सूनैना तांबेकर , तालुका उपाध्यक्ष रजनी शर्मा, तालुका सचिव अँड. मेघा धोटे, शहर अध्यक्ष संदीप आदे या सर्वांचा आँगस्ट महिन्यात वाढदिवस होता. त्यानीमीत्याने कडुनिंब, सीताफळ, सप्तपदी ,आवळा, पिंपळ आदी व्रूक्षाची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष बादल बेले यांनी केले. सदर ऊपक्रमाबद्दल महिला तालुका अध्यक्षा अल्का सदावर्ते , जिल्हा संघटक विजय जांभूळकर , तालुका उपाध्यक्ष दिलीप सदावर्ते ,सचिव सुजीत पोलेवार ,तालुका महिला संघटक राजश्री ऊपगन्लावार ,यासह नागपूर विभाग व चंद्रपुर जिल्हा कार्यकारणी ने उपक्रमाबद्दल अभिनंदन केले. नेफडो संस्थे तर्फे भविष्यातही अनेक पर्यावरणपूरक उपक्रमासोबतच मानवता विकासाकरीता संस्थेमार्फत उपाययोजना करण्यात येणार आहे असे बादल बेले तालुका अध्यक्ष
नेफडो यांनी कळविले आहे.