मैत्री सोहळ्यात जिल्ह्यातील छायाचित्रकार सन्मानित

0
667

मैत्री सोहळ्यात जिल्ह्यातील छायाचित्रकार सन्मानित

 

राज जुनघरे
बल्लारपूर (चंद्रपूर ):-
जळगाव जिल्ह्यातील निसर्गरम्य परिसर लाभलेल्या चारठाणा ता. मुक्ताईनगर येथे छायाचित्रकारांचा ” मैत्री सोहळा, क्षण आठवणीचा ” या उपक्रमा अंतर्गत मैत्रीचा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील फोटोग्राफर प्रशिक्षक व छायाचित्रकार उपस्थित होते. यात वैशिष्ट्य पुर्ण कार्य आणि चंद्रपूर जिल्ह्यातील छायाचित्रकारांचा मानबिंदू उंचावण्यासाठी महत्वाची भुमिका बजावणारे व संघटनेच्या माध्यमातून जनहितार्थ केलेल्या कार्याचा गौरव म्हणून छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर चे अध्यक्ष नितीन रायपुरे व सचिव फुलचंद मेश्राम यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
संपुर्ण चंद्रपूर जिल्ह्यात छायाचित्रकार संघटनेची मुहुर्तमेढ रोऊन प्रत्येक तालुका स्तरावर संघटनेची बांधणी करुन त्याचा वटवृक्ष केला. संघटनेच्या माध्यमातून सहभागी सभासदांना अपघात विम्याचे कवच देत सळक दुरघटना आणि एक लाख विमा संरक्षण असा उपक्रम नेटाने राबवित व्यवसायीक छायाचितरकारांच्या परिवारास दिलासा देण्याचे माध्यम उभे केले. कोरोना काळात निर्माण झालेली भिषन परिस्थिती आणि बंद पळलेला व्यवसाय पुन्हा नव्याने उभा करण्यासाठी दमछाक झालेल्या छायाचित्रकारांना व्यवसायीक गाडी रुळावर आणण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरविले. त्याचसोबत रत्नागिरी पुरग्रस्त छायाचित्रकार बंधूना भरिव मदत संघटनेच्या माध्यमातून पाठवून सामाजिक दायित्व जोपासले. जागतिक छायाचित्रकार दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करुन सामाजिक दायित्व जपण्यास संस्था अग्रेसर राहीली. विविध स्पर्धा, ट्रिझर स्पर्धा, फोटोग्राफर साठी कार्यशाळा संघटनेची स्वतंत्र कालदरशिका, असे अनेक उपक्रम राबविले. व महाराष्ट्रातील छायाचित्रकारांच्या हृदयात चंद्रपूर जिल्ह्याचे नाव कोरले. संघटनेचे अध्यक्ष नितीन रायपुरे व सचिव फुलचंद मेश्राम यांनी निर्माण केलेल्या वटवृक्षाच्या पारंब्या सर्वत्र पसरु लागल्या असुन अडचणीत असलेल्या व्यावसायिक छायाचित्रकारांच्या मदतीला संघटना धावून जात त्यांच्या हितासाठी अविरत कार्य करणाऱ्या या शिलेदारांचा प्रेक्षणीय स्थळ असलेल्या जळगाव जिल्ह्यातील चारठाणा येथे छायाचित्रकार व्यवसायातील प्रत्येक क्षेत्रातील प्रशिक्षक व छायाचित्रकार यांच्या उपस्थितीत स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here