विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रपूर शहर उपाध्यक्षपदी अंकुश रामचंद्र कोल्हे यांची निवड

0
329

विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रपूर शहर उपाध्यक्षपदी अंकुश रामचंद्र कोल्हे यांची निवड

अंकुश नागुलवार

चंद्रपूर: आज दि.३०/८/२०२० रोजी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे अंकुश रामचंद्र कोल्हे यांची चंद्रपूर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शहर उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. अंकुश कोल्हे हे फार्मसी कृती समितीचे विदर्भ कार्याध्यक्ष असुन विद्यार्थ्यांच्या विविध समस्या जाणून घेऊन सोडवण्यापर्यंतच त्यांचं कार्य पुर्ण विदर्भभर चालत. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चंद्रपूरचे शहराध्यक्ष राम इंगळे यांनी त्यांना चंद्रपूर शहराच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. निवड करताना शहराध्यक्ष राजूभाऊ कक्कड, विधानसभा अध्यक्ष सुनीलभाऊ काळे युवकशहराध्यक्ष प्रदीपभाऊ रत्नपारखी, सोशल मीडिया सेल प्रमुख नितीनभाऊ पिंपळशेंडे, नगरसेवक दिपकभाऊ जैस्वाल, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष रामदादा इंगळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here