अनुकंपाधारक उमेदवारांची भरती करा!मागणीची पुर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू! मनसेचे शहर अध्यक्ष मनदिप राेडेनी दिला इशारा!
चंद्रपूर अमाेल राऊत
राज्य शासनाने अनुकंपा भरतीसाठी सन २०१९ ते २१ पर्यंत २० टक्के जागा भरती करुन अनुकंपाधारकांना नौकरीत सामावून घेण्याचे स्पष्ट आदेश दिले असतांना देखिल स्थानिक प्रशासन (जिल्हा परिषद) दुर्लक्ष करीत असल्याचे एंकदरीत दिसुन येते दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील ८४० जागा रिक्त असतांना सुध्दा सहा वर्षांत आता पावेताे निव्वळ १७ जागा भरल्या असल्याचे मनसेचे युवा नेता मनदिप राेडेनी प्रसिध्दीसाठी दिलेल्या एका पत्रकात म्हटले आहे अद्यापही २५० अनुकंपाधारक उमेदवार प्रतिक्षा यादीत असून आर्थिक संकटाच्या चक्रात ते जीवन जगत आहे. जिल्हा परिषद नाेकर भरती करण्यांस सातत्याने टाळाटाळ करीत असुन या बाबतीत मनसेने अनुकंपधारकांना याेग्य न्याय मिळावा या साठी कंबर कसली आहे दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच्या पदाधिका-यांनी अनुकंपाधारकांसह जिल्हा परिषदेला भेट देत जि.प.च्या मुख्य अधिका-यांशी सविस्तर व विस्त्रूत चर्चा नुकतीच केली येत्या काळात अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष मनदिप रोडे यांनी दिला आहे. एव्हढेच नाही तर अनुकंपाच्या प्रश्नाबाबत मनसेने खासदार बाळू धानोरकर यांच्या सोबत चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्याशी देखिल चर्चा केली. विद्यमान खासदार धानोरकर यांनी अनुकंपाच्या प्रश्नाची दखल घेत त्वरीत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून नाेकर भरती करण्याची मागणी केली असल्याचे मनसे शहर अध्यक्ष मनदिप राेडे यांनी या प्रतिनिधीस एका भेटी दरम्यान सांगितले जिल्हा परिषद नाेकर भरती करण्यांस पुर्णता दुर्लक्ष करीत असल्याचा आराेप मनदिप राेडेनी केला आहे .नुकतेच त्यांनी या नाेकर भरती संदर्भात एक निवेदन जिल्हा परिषदेला सादर केले असल्याचे समजते .
