ग्रामीण रुग्णालय झाले ‘राम भरोसे’

0
446

ग्रामीण रुग्णालय झाले ‘राम भरोसे’

नागरिक हैराण, स्वच्छतेचा अभाव

 

कोरपना/प्रवीण मेश्राम : ग्रामीण रुग्णालय गडचादुर येथील अवस्था पाहल्यास स्वच्छ्तेचा अभाव दिसून येत आहे तरीपण येथील लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करताना दिसत आहे रुग्णाची गैरसोय व येथील घाणीचे साम्राज्य पसरले आहे. एक स्वच्छ्ता कर्मचारी आहे की नाही असा प्रश्न या रुग्णालय भागात दिसून येत आहे.काही भागात तर असे दिसून आले की मुट्रिघरातील वासे मुळे रुग्ण व त्यांच्यासोबत असणारे नाक दाबून रुग्ना जवळ ना इलाजने त्यांना राहावे लागत आहे .पण स्वच्छ्ता नाही मोठी शोकांतिका या रुग्णालयाची झालेली आहे. हि समस्या आज ची नाही तर प्रत्येक वेळी दुर्लक्ष पना या ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव दिसून येते आहे.अनेक निवेदने काही मंडळी नी दिली पण काहीच अर्थ नाही. या शहरातील सर्वात मोठी व तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामीण रुग्णालय आहे . जिवती कोरपना व आस पास चे सर्व रुग्ण या रुग्णालयात येतात .पण अस्वच्छतेने या रुग्णालयाची दयनीय अवस्था झाली आहे. तेथील घाणीचे साम्राज्य जनतेला आरोग्य बिघडण्यास कारणीभूत आहे .स्वच्छ्ता सुविधेच्या बाबतीत आरोग्य अधिकारी व लोक प्रतिनिधी या कडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय होण्यास अत्यंत आवश्यकता आहे. अशी अपेक्षा येथील जनतेची आहे .सोशल मीडिया वर याचा रोष व्यक्त करताना दिसून येत आहे. याकडे आरोग्य अधिकारी व लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय…? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here