सुधाकर मडावी उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कारने सन्मानित

0
386

सुधाकर मडावी उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कारने सन्मानित

भंगाराम तळोधित शाळाप्रवेशोत्सव व उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

 

गोंडपिपरी (सुरज माडुरवार)

जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा,भं.तळोधी येथे शाळाप्रवेशोत्सव व उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा नुकतच संपन्न झाला.
याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मी बालुगवार सरपंच भं.तळोधी, उद्घाटक वैष्णवी अमर बोडलावार सदस्य जि.प.चंद्रपूर , सुरेंद्र धाबर्डे उपसरपंच, संजय गोविंदवार अध्यक्ष शा.व्य.स, संजय रामगोन वार माजी अध्यक्ष शा.व्य.स,भानेश कंकलवार सचिव शूरवीर मल्हारराव होळकर बहुउद्धेशिय संस्था, लक्ष्मण येग्गेवार अध्यक्ष तं.मु.स, रामदास येग्गेवार,श्रीनिवास येग्गेवार, मालन धाबर्डे अंगणवाडी सेविका,नामदेव राऊत, सुनिल मुत्यालवार, रेखा कारेकर यांची उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुशांत निमकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार तानाजी अल्लीवार यांनी मानले.

 

दरवर्षी शूरवीर मल्हारराव होळकर बहुउद्धेशिय संस्था, भं. तळोधीच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाला उत्कृष्ठ शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार शाळेतील जेष्ठ शिक्षक सुधाकर मडावी यांना जाहीर झाला. त्यांचा सन्मान करन्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here