वृध्दांचा काठीचा आधार व्हा – श्यामसुंदर राऊत माजी सरपंच नांदा

0
441

वृध्दांचा काठीचा आधार व्हा – श्यामसुंदर राऊत माजी सरपंच नांदा

 

 

आवाळपूर : आपले जीवन सर्वस्व पणाला लावून आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह कसा चालवता येईल याचाच विचार करून कुटुंब फुलविण्यात व्यस्त राहून कुटुंब प्रमुख हा जीवनाचा गाढा चालवीत असतो. मात्र जेष्ठ झाले की त्यांचा काठीचा आधार कोणी होण्यास तयार नसते. त्यामुळे त्यांना असभ्य वागणुकीला समोर जावे लागते व हलाखीचे जीवन जगण्यास मजबूर होतात त्यामुळे युवकांनी त्याचा काठीचा आधार होणे गरजचे आहे. दिन दुबळ्यांचा सेवेला प्राधान्य देवून त्यांना मदत केली पाहिजे असे प्रतिपादन जेष्ठ नागरिक दिना निमत्य आयोजन केलेल्या सन्मान व सत्कार सोहळा दरमण्यान त्यांनी आपले मत व्यक्त केले.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी सभापती संजय मुसळे, प्रमुख अतिथी संजय गांधी निरधार योजना अध्यक्ष उमेश राजूरकर, उद्घाटक माजी सरपंच श्यामसुंदर राऊत, प्रमुख पाहुणे उपसरंच पुरुषोत्तम आस्वले, अंकुश धाबेकर, किसन गोंढे, महादेव डुकरे, सुरेश लोंढे हे उपस्थित होते.

संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना ही जेष्ठ नागरिकांसाठी तरहणार ठरत आहे. जेष्ठ नागरीकानी आपले कागदोपत्राची पूर्तता व ऑनलाईन करून याचा लाभ घेता येईल त्यासाठी आम्ही सुध्दा जास्तीत जास्त योजनेचा लाभ देण्यास तत्पर आहे असे मत उमेश राजूरकर संजय गांधी निराधार अध्यक्ष यांनी व्यक्त केले.

यावेळी 149 जेष्ठ नागरिकांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. भर पाऊसात ही जेष्ठाचां उत्साह मात्र काय होता ही विशेष. कार्यक्रमाचे संचालन सचिन बोढाले प्रास्ताविक रामकृष्ण रोगे तर आभार सतीश जमदाडे यांनी केले. सदर कार्यक्रमाला गावातील युवक व जि. प.शाळा वर्ग पहिला बाच 1986 यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here