दिवगंत पंप्रधान श्री राजीवजी गांधी यांच्या जयंती निमित्य सावरगाव येथे आशा वर्करचा सत्कार

0
294

दिवगंत पंप्रधान श्री राजीवजी गांधी यांच्या जयंती निमित्य सावरगाव येथे आशा वर्करचा सत्कार

यवतमाळ / कळंब

तालुक्यात सावरगांव येथे दिवगंत पंतप्रधान राजीव गांधी जयंती निमीत्त आशा वर्कर यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. कोविड १९ या विषाणुजन्य रोगाने संपुर्ण जगात धुमाळु घातला असतांना या रोगा पासुन बचाव करण्या साठी प्रत्येक गावातील आशा वर्कर अहोरात्र बचाव कार्य केले. तेव्हा त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना कार्य करण्याची प्रेरणा मिळावी या उद्देशाने दिवगंत पंतप्रधान श्री राजीवजी गांधी यांच्या जयंती निमीत्त कळंब तालुका युवक कॉग्रेस च्या वतीने आशा वर्कर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच या प्रसंगी वृक्षा रोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन जि. प. महिला व बाल कल्याण सभापती मा सौ जयाताई पोटे, माजी उपसभापती तथा सदस्य प. स. कळंब माश्री महादेवराव काळे, डॉ उईके मॅडम, राजुभाऊ पोटे, अशोकभाऊ उमरतकर, तालुकाध्यक्ष युवक कॉग्रेस राहुलसोनाळे, प्रशांत वाघमारे, प्रविण बोटरे, आरती जगताप, सौ. विवेका मोहणापुरे, सागर गौरखेडे, प्रज्वल लढे, खिरटकर इ. पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात सोशल डिस्टंनच्या नियमाये काटेकोरपणे पालन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here