पाटणबोरी येथे मराठी पत्रकार संघटनेची कार्यकारणी गठीत

0
412

पाटणबोरी येथे मराठी पत्रकार संघटनेची कार्यकारणी गठीत

 

पाटण बोरी (यवतमाळ), मनोज नवले : यवतमाळ जिल्ह्याचे केळापूर तालुक्यातील पाटणबोरी येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेची नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली.या बैठकीत अध्यक्ष पदी सचिन पत्रकार तर कार्याध्यक्ष पदी विनोद कनाके यांची सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली.पाटणबोरी येथील पत्रकार संघटनेची कार्यकारणी गठीत करण्यासाठी येथील कालिका माता मंदिरात 19 सप्टेंबर रोजी बैठक घेण्यात आली.परंतु नियोजीत बैठकीत नव्यांना संधी न देता एका जुन्याच व्यक्तीला अध्यक्ष बनविले होते.ही बाब उपस्थित अनेक पत्रकार बांधवाना पटली नाही.त्यामुळे जवळपास तेरा पत्रकारांनी एकत्रित येवुन जेष्ठ पत्रकार जयंत भागानगरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली.

 

 

या बैठकीत पाटणबोरी मराठी पत्रकार संघटनेच्या अध्यक्ष पदी सचिन पत्रकार, उपाध्यक्ष पदी आदित्य भागानगरकर, कार्याध्यक्ष विनोद कनाके ,सचिव सचिन गुडेटवार, सहसचिव भास्कर मालीकर, कोषाध्यक्ष मोहन एनगुर्तीवार, तर सदस्य म्हणून संध्याताई भागानगरकर, अमन सिडाम,कार्तिक धुर्वे, सल्लागार म्हणून गोपालजी शर्मा, नंदुभाऊ अर्गुलवार, मोबीन जाटू, अनिल गुंडेवार व जयंत भागानगरकर यांची सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here