विहिरीत उडी घेवून शेतकऱ्याची आत्महत्या

0
541

विहिरीत उडी घेवून शेतकऱ्याची आत्महत्या मार्डी येथील घटना

 

 

मारेगाव/वणी (यवतमाळ), मनोज नवले

तालुक्यातील मार्डी येथील शेतकऱ्याने बुद्ध विहारच्या शेजारी असलेल्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. गजानन हरी निमसटकर (वय ७२ वर्षे) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. १९ सप्टेंबर रोज रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने संपूर्ण पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

 

मार्डी येथील शेतकरी गजानन निमसटकर हे १९ सप्टेंबरला रोज रविवारला चार वाजेपासून राहत्या घरातून बाहेर पडले होते. बुद्ध विहारच्या शेजारी असलेल्या विहीरीत उडी घेत त्यांनी आत्महत्या केली. ते घरात आढळून न आल्याने कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध सुरु केली असता दुपारी दीड वाजेच्या सुमारास गजानन निमसटकर यांचा मृतदेह बुद्ध विहारच्या शेजारी असलेल्या विहीरीत आढळून आला. पोलीस पाटील डॉ. प्रशांत पाटील यांनी याघटनेचे माहिती मारेगाव पोलीसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह विहिरीतील पाण्यातून बाहेर काढला व उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात हलविला. याप्रकरणी मयताचा मुलगा यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार मारेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार पुढील तपास करत आहेत. मयत गजानन निमसटकर यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. गजानन शेतातील नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गजानन निमसटकर यांनी आत्महत्या केल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. शेतकरी आत्महत्येच्या सदर घटनेने पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here