कटाक्ष:मोदी उत्तरे द्या! जयंत माईणकर

0
326

कटाक्ष:मोदी उत्तरे द्या! जयंत माईणकर

गेल्या आठवड्यातील माझ्या साप्ताहिक स्तंभात मी सत्ताधार्यांना प्रश्न विचारण किती महत्त्वाचे हे अधोरेखित केले. आज त्या लेखाच्या उत्तरार्धात मी पत्रकारांशी कधीही न बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खालील प्रश्न विचारत आहे.

१)२००१ ते २०१२ या दरम्यान आपण चार विधानसभा निवडणूक लढल्या त्यावेळी पत्नीच्या नावाचा कॉलम आपण का रिकामा ठेवला?आपल्याला पत्नी असून तिचं नाव जसोदाबेन आहे याची जाणीव आपल्याला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या चुकीची माहिती दिल्यास निवडणुकीस अपात्र ठरविण्यात येईल या कडक निर्बंधानंतर झाली. आणि हे खरे असेल तर हे योग्य आहे का?

२)जसोदाबेन यांनी पासपोर्ट साठी केलेला अर्ज का नाकारण्यात आला? तुम्ही त्यांचं नाव अफेडीव्हीट मध्ये लिहिल्यानंतर विवाहाच प्रमाणपत्र नाही म्हणून पासपोर्ट नाकारणं कितपत सयुक्तिक आहे? तसेच त्यांना दिलेल्या पोलीस संरक्षणाविषयीची संपूर्ण माहिती आणि पंतप्रधानांची पत्नी म्हणून मिळणारे इतर फायदे याची माहिती त्यांना माहिती कायद्यांतर्गत का नाकारण्यात आली.

३)जीएसटी आणि नोटबंदी ह्या दोन्ही वादग्रस्त निर्णयामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर भिषण परिणाम झाले आहेत.या कायद्याचे मुख्य प्रवर्तक या नात्याने या कायद्याच्या परिणामांची जबाबदारी आपण स्वीकारणार?

४)पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना त्यांच्या देशात अचानक भेटून त्यांच्या आईच्या पाया पडणं यात तुमची कुठली राजकीय परिपक्वता दिसली?

५)आपल्या भाषणात आपण नेहमी परदेशात अडकलेला काळा पैसा वापस आणून देशाच्या विकासासाठी वापरू अस सांगितले होत.आपल्या दृष्टीने सुमारे ९०लाख कोटी रुपये परदेशी बँकेत भारतीय लोकांचा काळा पैसा होता. त्यापैकी आतापर्यंत किती वापस आणण्यात यश आलं? पूर्ण ९०लाख कोटी केव्हा आणणार?

६)आपण महात्मा गांधींना राष्ट्रपिता मानता?हा प्रश्न विचरण्याच कारण आपल्या पक्षाच्या खासदार प्रज्ञा सिंग यांनी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं आहे.आपण एकाचवेळी गांधींना राष्ट्रपिता आणि गोडसेला देशभक्त मानता?

७)गेल्या सहा वर्षात तुमच्या सरकारने किती लोकांना रोजगार दिला आणि याच काळात किती जण बेरोजगार झाले आणि याच सहा वर्षात देशात किती लोकांना रोजगार देणारी किती रुपयांची परकीय गुंतवणूक भारतात झाली आहे?

१०)सत्तेवर असणारा भाजप हा सत्तेबाहेरील भाजप पेक्षा जास्त धोकादायक असतो,अस गोध्रा, दिल्ली दंगलीत दिसलं आहे. या दंगली स्टेट स्पॉन्सर्ड असल्याचा आरोप केला जातो. तुमची प्रतिक्रिया?

११)गोमांसाच्या संशयाने MOB लिंचिंगच्या घटना संपुर्णपणे चूक आहेत असं तुम्ही का म्हणत नाहीत. गाईसाठी एखाद्या माणसाला मारल्या जाणं कितपत योग्य?

१२)स्व. अटल बिहारी वाजपेयी आणि डॉ सुब्रमण्यम स्वामी यांचं कधीच जमलं नाही. स्वामींनी वाजपेयींवर बाई-बाटली पर्यंत खुलेआम आरोप केले आहेत. आज स्वामी आपल्या पक्षाचे नामनियुक्त खासदार आहेत. वाजपेयींच्या मृत्यूनंतर त्यांना पक्षात घेतलं. या सर्व घटनांचा अन्वयार्थ काय घ्यायचा? केवळ वाजपेयीसाठी स्वामींना पक्षाबाहेर ठेवलं गेलं? स्वामींच्या वाजपेयींवरील आरोपाविषयी तुमचं मत काय? स्वामी आजही तुमच्या सरकारच्या अनेक निर्णयांवर टीका करतात. प्रतिक्रिया?

१३)कोरोनाविषयी राहुल गांधींनी सूचना देऊनही कारवाई करण्यास २५ मार्चपर्यंत वेळ लावण्याचं कारण मध्य प्रदेश मध्ये सत्तांतर हेच आहे. आणि पक्षासाठी देशाला पणाला लावणं योग्य आहे का?

१४)गेल्या सहा वर्षात गैर भाजपेतर११९ आमदारांनी राजीनामा दिला. प्रत्येक आमदाराच्या राजीनाम्यासाठी तथाकथित रीत्या२५ कोटी रुपये दिल्याचा आरोप केला जातो. काँग्रेसच्या काळातही या घटना घडल्या हा बचाव न करता, लोकशाहीच्या संरक्षणासाठी असे राजीनामे विकत घेणे योग्य आहे का?

१५) सुमारे दहा हजार लोकांचा बळी गेल्यानंतर आणि देशाचं अतोनात आर्थिक नुकसान झाल्यानंतर अयोध्येत होत असलेल राम मंदिर हे आपल्याला खरच हिंदू अस्मितेच प्रतिक वाटत?

१६)पुलवामा हत्याकांडावरील आरोप आणि उरीवरील संशय यावर स्वतः उत्तर न देण्याच कारण?लष्करी कारवाईवर असे प्रश्न उपस्थित होणं कितपत योग्य? काश्मीरला वेगळा दर्जा देणार ३७० कलम रद्द केल्यानंतरही काश्मीर मध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे.याचा अर्थ ३७० रद्द करून काहीही फायदा झाला नाही. आपली प्रतिक्रिया!

१७) संघाच्या शाखात ताजमहाल हे तेजोमहल मंदिर असल्याचं सांगितलं जातं! अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताजमहाल भेटीच्या वेळी सरकारने संघाची भूमिका मांडली की ऐतिहासिक तथ्य सांगत जगातल्या सात आश्चरयांपैकी एकाच श्रेय मुघल बादशहा शहाजहानला दिलं त्याचबरोबर भारताचा इतिहास बदलून हिंदुत्वप्रणित इतिहास लिहिण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे हे खरे आहे काय?

१८)अचानक केलेल्या लॉकडाऊनमुळे महानगरातील करोडो मजुर पायी हजारो किमी अंतरावरील आपल्या गावाकडे गेले. त्यांना त्या काळात खूप त्रास सहन करावा लागला. याला केवळ केंद्र सरकार जबाबदार आहे. योग्य नियोजन न करता लॉकडाउन जाहीर करण्याची तुमची चूक तुम्ही मान्य करता? मान्य असल्यास त्या चुकीचे परीमार्जन कसे करणार?

माझे एक वाचक जमिल यांनी लेख वाचून मला पाठवलेला शेर लिहून हा प्रश्नरूपी लेख संपवतो.

करोड़ों जनता से संवाद करने वाले मोदी जी पत्रकार परिषद से डरते क्यों हो
सीना 56 इंच का पद पीएम का फिर अकेले मन की बात करते क्यों हो
नजर से नजर मिलाने की हिम्मत नहीं अगर तो फिर चौकीदार बने फिरते क्यों हो
हम तो आपके निशाने पे आने को है तैयार फिर बेवजह हवा में तीर फेकते क्यों हो
पत्रकार परिषद वह बुलाएंगे विश्वास है दिलको
जमील जरा धैर्य रखो बद दिल होते क्यों हो

मो. अतीकूर रहमान (जमील) वडनेर भोलजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here