दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसा निमीत्य आप चे शहर सचिव राजु शंकरराव कुडे यांच्या  नेतृत्वात आम आदमी पार्टी बाबूपेठ तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप

0
460
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसा निमीत्य आप चे शहर सचिव राजु शंकरराव कुडे यांच्या  नेतृत्वात आम आदमी पार्टी बाबूपेठ तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप
दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टी चे राष्ट्रीय संयोजक श्री अरविंद केजरीवालजी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आज दिनांक 17/08/2021 रोज मंगळवार ला दुपारी 12 वाजता नवयुवक माध्यमिक  शाळा बाबुपेठ येथे आम आदमी पार्टी बाबूपेठ तर्फे शालेय साहीत्याचे वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये शाळेचे शिक्षक /शिक्षिका, समाज सेवक,आणि आम आदमी पक्षाच्या बाबुपेठ येतील कार्यकर्त्यांनी, विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजु शंकरराव कुडे तर प्रमूख पाहुणे गुरुदेव सेवा मंडळ बाबुपेठ चे सचिव भाऊराव जी ढोके आणि जगूया माणुसकी साठी संस्थेचे अध्यक्ष कार्तिक बल्लावार हे होते, कार्यक्रमाचे संचालन अमोल पालेकर सर यांनी केले आपल्या प्रस्तावित भाषणामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष राजु शंकरराव कुडे यांनी विद्यार्थ्यांना देश भक्ती स्वतः मध्ये कश्या प्रकारे रुजवली जाते आणि त्यातून एक चांगला विद्यार्थी,व्यक्ती कसा निर्माण होतो हे मुलांना पटवून दीले,  देशाला योग्य दिशा येणारी सुशिक्षित तरुण पिढीच देऊ शकते हे केजरीवाल यांचे मत असून त्यामुळे ते दिल्लीत शिक्षणावर जास्त भर देऊन दिल्लीचे शिक्षण बजेट सर्वाधिक २५% केले आहे.
आणि अनेक लोकहिताचे काम त्यांच्या हातून घडत असल्याचे त्यांनी म्हटले. तर आभार प्रदर्शन निखिल बारसागडे यांनी केले.
या कार्यक्रमा प्रसंगी पक्षाचे वरिष्ठ कार्यकर्ते राजू भाऊ कुळे, चंदू माडुरवार, कालिदास ओरके, अनुप तेलतुमडे, कोमल कांबळे, जयंत रामटेके, जयंत थूल, सय्यद अश्रफ, बाबाराव खडसे, कार्तिक बल्लावार, भाऊराव ढोके, सुखदेव दारुंडे, दीपक उंदिरवाडे, निखिल बारसागडे, महेश गुप्ता, बाला खैरे, सुरेन्द्र जीवने इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here