विशेष चौकशी पथकाकडून दोन तास महिलेची बंदद्वार चौकशी ; घाटंजी पोलिस ठाण्यात नोंदवला जवाब

0
459

विशेष चौकशी पथकाकडून दोन तास महिलेची बंदद्वार चौकशी ; घाटंजी पोलिस ठाण्यात नोंदवला जवाब

 

वणी (यवतमाळ), मनोज नवले : यवतमाळ जिल्ह्याचे घाटंजी तालुक्यातील सेवानगर येथील एका महिलेने घाटंजी पोलिस व पोलिस अधीक्षक कार्यालयात पत्र पाठविले. त्यात महिलेने आमदार संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले. आज जबाब नोंदविण्यासाठी महिला घाटंजी पोलीस ठाण्यात पोहोचली. विशेष तपास पथकाने बंदद्वार दोन तास महिलेची चौकशी केली.

 

महिलेच्या पत्राची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी तत्काळ विशेष चौकशी पथकाचे गठन केले. काल एसआयटीने बयान नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वडिलांची प्रकृती बरोबर नाही. माझीही मनस्थिती बरोबर नाही, असे निवेदन पोलिसांना दिले होते. अखेर आज बयान देण्यासाठी महिला पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. यावेळी पथक प्रमुख अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांच्यासह अवधूतवाडी पोलिस ठाण्याचे ठाणेदार मनोज केदारे, घाटंजीचे पोलिस निरीक्षक बबन कराळे, सायबर सेल, महिला सेल, भरोसा सेल प्रमुख उपस्थित होते.संपूर्ण चौकशी झाल्यानंतर संबंधित महिलाही चारचाकी वाहनांमध्ये गावाकडे परतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here