जननायक बिरसा मुंडा स्मारक सन्मानाने उभारण्यात यावा आदिवासी बांधवांची एकमुखी मागणी

0
460

जननायक बिरसा मुंडा स्मारक सन्मानाने उभारण्यात यावा आदिवासी बांधवांची एकमुखी मागणी

चंद्रपूर- किरण घाटे – प्रतिनिधी

चंद्रपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचा मागील सहा महिन्यांपासुन जननायक बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यासाठी बैठा सत्याग्रह सुरू आहे. याच ठिकाणी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिन अशोक तुमराम यांच्या अध्यक्षतेखाली, नरेन गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात जननायक बिरसा मुंडा यांचा पुतळा परत सन्मानाने उभारण्यात यावा अशी एकमुखी मागणी आदिवासी बांधवांतर्फे करण्यात आली. सदरहु कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवराज मेश्राम, अशोक उईके, कैलास पाटील, पुरूषोत्तम सोयाम, गोकुल मेश्राम, डॉ. प्रविण येरमे, सौ. जमुना तुमराम, डॉ. शारदा येरमे, कु. रंजना किन्नाके, वंदना मेश्राम, वेणुताई कोवे, अंजना मडावी,शांताबाई मडावी, मैनाबाई मेश्राम, नंदा मेश्राम, निता सोयाम, प्रदिप गेडाम व सर्व समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here