कोकण पूरग्रस्तांसाठी एरंडोल तालुका मराठी पत्रकार संघातर्फे मदतफेरी शहरातील नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद..!!

0
590

कोकण पूरग्रस्तांसाठी एरंडोल तालुका मराठी पत्रकार संघातर्फे मदतफेरी शहरातील नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद..!!

 

 

प्रतिनिधी/ एरंडोल

एरंडोल :- तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोकण व पश्चिम महाराष्ट्र येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरात मदतफेरी काढण्यात आली.यामध्ये शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

पोलीस स्थानकाच्या प्रांगणापासून या मदत फेरीची सुरुवात प्रांताधिकारी विनय गोसावी, नगराध्यक्ष रमेश परदेशी, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, ज्येष्ठ नगरसेवक डॉक्टर सुरेश पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, ओबीसी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, माजी नगरसेवक जगदीश ठाकूर, दशरथ चौधरी, प्रमोद महाजन, प्रकाश शिरोळे, ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव अहिरराव,कमरली सय्यद, जावेद मुजावर,सुरेश ठाकरे, केदारनाथ सोमानी, या मान्यवरांच्या हस्ते मदत फेरीस मदत करून सुरुवात करण्यात आली,

मरीमाता मंदिर, मेन रोड बुधवार दरवाजा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भगवा चौक, मारवाडी गल्ली, अमळनेर दरवाजा, नागोबा मढी, महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल या मार्गाद्वारे ही मदत फेरी काढण्यात आली यामध्ये शहरातील नागरिक माता भगिनी यांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला व या मदत फेरी मध्ये एकूण 19370 रुपये व 2 कट्टा गव्हू,4 कट्टा तांदूळ, 10 साडी आहेरच्या,9 पँकीग ड्रेस मुला-मुलीचे,1 नग 20-20 कुरकुरे बाँक्स,1 फास्ट फूड बॉक्स, 5 टाँवेल आघोळीचे, 1प्लास्टिक डबे बॉक्स एवढा सामानाचे संकलन करण्यात आले.

या मदत फेरीसाठी शहरातील दानशूर व्यक्ती संजय काबरा,अशोक चौधरी, भगवान पाटील महेश देवरे, मनोज ठाकूर, लीलाधर पाटील सर्वंन शेठ, एस आर पाटील, प्रमोद चौधरी, यांनी भरीव मदत केली.

या मदत फेरीसाठी मैत्री सेवा फाऊंडेशनचे सागर महाजन, पंकज पाटील, गौरव महाजन संतोष जैस्वाल देवानंद निकम, मुकेश महाजन, करण पाटील, प्रितेश पाटील, तसेच एरंडोल पोलीस स्थानकाचे संदीप सातपुते अनिल पाटील अकिल मुजावर यांचेसह भूषण चौधरी योगेश चौधरी तेजस चौधरी, मोहन लोहार धनु बाळापुरे यांचेसह एरंडोल तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय चौधरी मीडिया विभागाचे तालुका प्रमुख विकी खोकरे यांनी परिश्रम घेतले.

अजून एरंडोल शहरातील दानशूर व्यक्तींना कोकणसह पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये झालेल्या पूरग्रस्तांना मदत द्यायची असेल त्यांनी मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय चौधरी यांच्याशी संपर्क साधून देऊ शकतात अशी माहिती एरंडोल तालुका मराठी पत्रकार संघातर्फे देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here