हिंगणघाट येथील इंदिरा गांधी वार्डातील रस्त्याची दुरवस्था.

0
542

हिंगणघाट येथील इंदिरा गांधी वार्डातील रस्त्याची दुरवस्था.

नागरिकांची होत आहे हेळसांड,लवकऱ्यात लवकर करण्याचे नगराध्यक्ष यांचे आश्वासन 

हिंगणघाट (वर्धा):- अनंता वायसे तालुका प्रतिनिधी

हिंगणघाट शहरातील इंदिरा गांधी वार्ड येथील रोडच्या दुरवस्थेने नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. इंदिरा गांधी वार्ड येथील कृपाराम टिंगरे यांच्या घरापासून सार्वजनिक संडास पर्यंत मुरूम टाकण्यात यावे तसेच हनुमान मंदिर परिसरातील ध्वजरोहण स्तंभजवळ चोरी टाकण्याबाबत नगरसेवक सौरभ तिमांडे सह सय्यद नाजीर अली यांनी नगराध्यक्ष प्रेम बसंतांनी तसेच मुख्याधिकारी न.प यांना निवेदन देऊन तात्पुरती रोडची डागडुजी करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

सार्वजनिक संडास कडे जाण्याकरिता नागरिकांना चिखल तुडवत जावे लागते व त्या चिखलामुळे अनेक वेळा अपघात सुद्धा झाले आहे. करीता आपण १५० फोटो अंतरात बारीक मधून टाकावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

तसेच दर वर्षी प्रमाणे वार्डातील नागरिक १५ ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन साजरा करतात परंतु त्या परिसरात खूप चिखल झाले असून कार्यक्रम साजरा करताना अडचण निर्माण होत आहे त्यामुळे हनुमान मंदिर परिसरातील ध्वजस्तंभ जवळ चुरी टाकण्यात यावी.

तरी इंदिरा गांधी वार्डातील नागरिकांचे हित लक्षात घेता लवकरात लवकर निवेदनाची दखल घ्यावी अशी मागणी नगरसेवक सौरभ तिमांडे सह सय्यद नाजिर अली यांनी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

इंदिरा गांधी वार्डतील नागरिक राजेंद्र नहाटे, प्रवीण चावरे,वसीम काजी,पुरुषोत्तम जवादे,वहीद खान, लता बैस, वनश्री रंदये, समद शेख, अयान शेख, समसाद आलम, के.टिंगरे, शेख रहेमान,सय्यद आमशा, साबिर नवाब, जाहिद शेख, इरफान पठाण,शेख रमजान, गणपत मुगल, प्रवीण मोहुले, सय्यद शब्बीर,जुनेद खान, शेख नाजिर,अनिल गुहर इत्यादीने स्वाक्षरी करून मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here