हिंगणघाट शहरात पुरपिडीत लोकांना सिटी सर्व्हे करून पट्टे नावी तसेच शहरातील झोपडपट्टी धारकांना स्थायी पट्टे द्या – राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेनां मागणी

0
524

हिंगणघाट शहरात पुरपिडीत लोकांना सिटी सर्व्हे करून पट्टे नावी तसेच शहरातील झोपडपट्टी धारकांना स्थायी पट्टे द्या – राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेनां मागणी

हिंगणघाट (वर्धा), अनंता वायसे तालुका प्रतिनिधी

शहरातील पुरपीडित लोकांना सिटी सर्वे करून पट्टे नावी करुणदेण्या बाबत तसेच झोपडपट्टी धारकांना स्थायी पट्टे देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव तिमांडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी विधार्थी काँग्रेसचे हिंगणघाट शहर उपाध्यक्ष युवराज माऊस्कर यांनी नगरविकास मंत्री प्राजक्त तनपुरे वर्धा येथे दौऱ्या निमित्य आले असतांना निवेदन द्वारे मागणी केली.
सन १९८६ मधी हिंगणघाट शहरात आलेल्या पुरा मध्ये अनेक लोकांना आपली घर गमवावी लागली. त्या वेळी मा. शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना पुरपिडीत लोकांना शासणा तर्फे क्वार्टर घर देण्यात आले . याच संदर्भात आज हिंगणघाट राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेस पदाधिकार्यांनी शहरातील पुरपिडीत क्वार्टर धारकांचा सिटी सर्व्हे करून लवकरात लवकर त्यांना त्यांचे पट्टे नावी करून द्या ही मागणी वर्धा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निरीक्षक तथा नगरविकास ऊर्जा,आदिवासी उच्च तंत्र शिक्षण विभाग,पुर्नवसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे साहेब यांचे वर्धा जिल्ह्यातील कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा दरम्यान केली.
त्यावेळी त्यांचा सोबत हिंगणघाट राष्ट्रवादी विधार्थी काँग्रेसचे हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष अमोल त्रिपाठी , विधार्थी शहर अध्यक्ष राहुल कोळसे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस समुद्रपुर तालुका अध्यक्ष सौरभ साळवे ,हिंगणघाट शहर उपाध्यक्ष युवराज माऊसकर, उपाध्यक्ष पवन काकडे , शहर अध्यक्ष शकील अहमद,रा.यु.काँचे सचिव विपुल थुल,हिंगणघाट तालुका अध्यक्ष नयन निखाडे,सचिव रितू मोघे ,सोशल मीडिया समन्वयक वैभव मानकर,कुणाल हिवसे ,मोहित झाडे,हर्षल बुरीले, साहिल भुते, शशांक भगत, तेजस बुरीले, विवेक ठालाल, वेदांत नवणागे, प्रतीक समर्थ, हर्षल वरघणे,यश निखाडे,अनिकेत फुलजले, आदर्श गायकवाड, जय भोपले, तेजस खवशी आदी मंडळी उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here