ग्रुपच्या सदस्यांनी केली शहीद कुटुंबीयांना आर्थिक मदत सुपूर्त

0
456

काही दिवसापूर्वीच केले होते ग्रुपच्या सदस्यांनी मदतीचे आव्हान

परभणी जिल्हा प्रतिनिधी/आरूणा शर्मा

पालम तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यात सर्वात अग्रेसर असलेला आपले पालम व्हाट्सअप ग्रुपच्या सदस्यांनी शहीद कुटुंबीयांना दि.30 मे रोजी आर्थिक मदत देण्याचे आव्हान केले होते या आव्हानाला प्रतिसाद देत दि 3 रोजी शनिवारी जमा झालेले 65 हजार रुपयाची मदत सुपुर्त करण्यात आली
पूर्णा तालुक्यातील महागाव येथील जिजाभाऊ किशनराव मोहिते हे कर्तव्य असताना दि. 28 में रोजी शहीद झाले त्यांच्या जाण्यामुळे घरातील कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले. त्यातून सावरण्यासाठी फूल नव्हे तर फुलाची पाकळी म्हणून आर्थिक मदतीचा अहवान ग्रुपच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांसाठी करण्यात आले होते. त्यात कसलाही विलंब न करता आपले पालम व्हाट्सअप ग्रुपने सहभाग घेत. ग्रुपच्या बहुतांश मेंबरने उदारमतवाद दाखवीत मदतीचं अहवान केलेल्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली. पहाता, पहाता 65हजार एवढी रक्कम जमा झाली. विशेषता सर्व क्षेत्रातील लोकांनी आर्थिक मदत केली. जमा झालेली ही रक्कम आपले पालम व्हाट्सअप ग्रुप च्या सदस्यांनी दि 3 रोजी शनिवारी त्यांच्या महागाव येथे जात किशनराव मोहिते यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली यावेळी अभय कुमार कदम बाबुराव आवरगंड विलास चव्हाण राहुल गायकवाड महेंद्रकुमार रोहिणीकर. ह भ प नारायण महाराज पालमकर.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कालिदास निरस.झेटिंग पाटील. पांडुरंग रुद्रवार. मारोती नाईकवाडे. भगवान सिरस्कर रामप्रसाद कदम. आदींची उपस्थिती होती..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here