राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मंगळवारी परभणी जिल्ह्यात

0
455

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मंगळवारी परभणी जिल्ह्यात

परभणी-आरूणा शर्मा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील हे मंगळवारी (दि.29 जून) राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे निमित्त परभणी जिल्ह्याच्या दौर्‍यावर दाखल होणार आहेत. मंगळवारी दुपारी पावणे दोन वाजता त्यांचे जिंतूरला आगमन होणार असून अडीच ते सव्वा तीन या वेळेत ते जिंतूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. तेथून ते परभणीत पावणे पाच वाजता आयोजित केलेल्या ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीस हजेरी लावणार असून साडेपाच वाजता जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांबरोबर आढावा बैठक घेणार आहेत. साडेसहा वाजता परभणी विधानसभा मतदार संघाअंतर्गत पदाधिकारी कार्यकर्त्यांबरोबर चर्चा व सव्वा सात वाजता परभणी शहर महानगर जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीस ते उपस्थित राहणार आहेत. परभणीत ते मुक्कामी असून बुधवारी ते साडेदहा वाजता गंगाखेडात दाखल होणार आहेत. त्याही ठिकाणी सव्वा आकरा वाजता विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक, पावणे एक वाजता पाथरीत विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक आटोपून ते सव्वा तीन वाजता परतूरकडे रवाना होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष किरण सोनटक्के यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here