जननायक बिरसा मुंडा यांचे स्मारक तातडीने तयार करा!

0
439

जननायक बिरसा मुंडा यांचे स्मारक तातडीने तयार करा!

अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा आदिवासी विकास संस्था चंद्रपूरचा इशारा

चंद्रपूर/प्रतिनिधी (२१ जून) : चंद्रपूर येथील भगवान बीरसा मुंडा ह्यांची प्रतिमा नगर पालिकेने हटवून आजतागायत चार महीने उलटले. तेव्हा पासून आज पर्यंत त्या जागेवर आदिवासी समाजाचे धरणे आंदोलन सुरू आहे. प्रशासन व लोक प्रतिनिधी ह्यांच्या सोबत अनेक चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. प्रशासनाने एका महिन्यात होत्या त्या ठिकाणी पुतळा बसवून देऊ अशी ग्वाही माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, महानगर पालिका आयुक्त व समाजाचे शिष्ट मंडळ ह्यांच्या बैठकीत दिली.
पण तीन महिने उलटून सुध्दा अजूनपर्यंत पुतळा बसविण्याचे काम सुरू झाले नाही. कागदपत्रे तयार केली नाही. त्यामुळे आदिवासी समाजाचे अशोक तुमराम ह्यांनी आमरण उपोषणास बसण्याचा धोका पत्करला. तरी प्रशासन गांभीर्याने दखल घेत नाही.
आज आदिवासी समाजाचे एक दिवसीय आंदोलन करण्यात आले. शेकडोंच्या संख्येने आदिवासी समाज आंदोलनाच्या ठिकाणी येऊन प्रशासनाला दाखवून दिले की, या समोर यापेक्षा उग्र व मोठ्या संख्येने आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज जिल्हाधिकारी ह्यांना निवेदन देऊन करण्यात आला.
जो पर्यन्त पुतळा नियोजित ठिकाणी बसत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचे प्रण अशोक तुमराम ह्यांनी केले आहे. यानंतर होणारे आंदोलन इतर राजकिय पक्ष, आदिवासी विविध संघटनांनी मिळून करू असे विविध संघटनेच्या प्रतिनिधींनी ग्वाही आज आंदोलन स्थळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here