पेट्रोल व डिझेलच्या कमती कमी करा :- अनीस भाई खुरेशी

0
486

पेट्रोल व डिझेलच्या कमती कमी करा
अनीस भाई खुरेशी

परभणी जिल्हा प्रतिनिधी
आरूणा शर्मा
मे. 8975303555

पालम एम.आय.एम. शाखेच्या वतीने तहसीलदार पालम यांच्या मार्फत मा.केंद्रीय सचिव,पेट्रोलियम विभाग दिल्ली व मा.सचिव विक्रीकर विभाग,महाराष्ट्र शासन मुंबई यांना पेट्रोल व डिझेल यांच्या दरामध्ये कमीत कमी 25 टक्के दर कमी करून राज्यातील जनतेस दिलासा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या
दिलेल्या निवेदनात नमूद केले की पेट्रोल डिझेल हे आजच्या परिस्थितीमध्ये जीवनावश्यक वस्तू झाली आहे. केंद्रशासन 33 रुपये प्रति लिटर पेट्रोल तर 32 रुपये प्रति लिटर डिझेलचे दर आकारात आहे.तसेच राज्य शासन व्हॅटच्या नावाखाली 25 टक्के प्रति लिटर पेट्रोल व 22 प्रति लिटर डिझेल वर आकारीत आहे. ही वस्तुस्थिती 15 मार्च 2021 रोजीच्या प्रमाणे आहे. केंद्र शासन व राज्य शासनाने आपले टॅक्सेस कमी करून, पेट्रोल-डिझेल याचे प्रतिलिटर टॅक्स कमी करून सध्या आकारण्यात आलेल्या किमतीमध्ये 25 टक्के घट/कपात केली पाहिजे,तसेच रसोई गॅस व गोडतेल/खाद्य पदार्थ तेलच्या किमती कमी करून जनतेस दिलासा देण्यात यावा असे निवेदनावर
एम.आय.एम पक्षाचे पालम तालुका प्रभारी अध्यक्ष अनिस खुरेशी,अँड.
अझहरोद्दीन खतीब, हक्कानी खान पठाण, हाफिज खुरेशी,सादात खा पठाण,शेख निजाम,
शेरखान पठाण,शेख अल्तमश आदी कार्यकर्ते उपस्थित होते‌.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here