विहीरगाव येथे एक दिवसीय शेती विषयक शाळेचे कार्यक्रम संपन्न

0
243

विहीरगाव येथे एक दिवसीय शेती विषयक शाळेचे कार्यक्रम संपन्न
इम्पॅक्ट24 न्युज तालुका प्रतिनिधी:अमोल राऊत
राजुरा(विहीरगाव):-14/08/2020 रोजी शुक्रवारला राजुरा तालुक्यातील विहीरगाव येथील ग्रामपंचायतच्या पटांगणात कृषी विभागाच्या वतीने शेती विषयक माहिती देण्यात आली.या शेती शाळेत शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करत असताना येणाऱ्या समस्येबद्दल विस्तृत माहिती सांगण्यात आले.शेती व्यवसाय करत असताना पिकांवर येणाऱ्या नवनवीन बिमाऱ्यांवर कोणत्या व कश्या प्रकारे औषधीची फवारणी करावी.याबद्दल सखोल माहिती या शेती विषयक शाळेत सांगण्यात आली.शेतकऱ्यांनी जास्त कीटकनाशक व औषधे न फवारता पीक घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी केले.या कार्यक्रमाला डॉ.उदय पाटील जिल्हा कृषी अधिकारी चंद्रपूर,गोविंद मोरे उपविभागीय अधिकारी कृषी विभाग राजुरा,कटलग साहेब तालुका कृषी अधिकारी राजुरा,इर्शाद शेख उपसरपंच विहीरगाव,मेकपल्ली साहेब मंडळ अधिकारी राजुरा,सूर्यवंशी साहेब ग्रामसेवक,वाघमारे साहेब कृषी सहायक,भारत चव्हाण,गावातील शेतकरी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here