गोंडपिपरी उदयापासून चार दिवस बंद

0
554

गोंडपिपरी उदयापासून चार दिवस बंद

कोरोनाबाधितांच्या पाश्र्वभुमीवर प्रशासनाचा निर्णय

गोंडपिपरी

गोंडपिपरी पंचायत समिती प्रशासनात कोरोना बाधित निघाले.सोबतच नगरातील काहींना लागण झाली.यामुळ खबरदारीचा उपाय म्हणून उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांनी गोंडपिपरी शहरात उदया दिनांक 16 आॅगष्ट पासून चार दिवस कळकळीत बंदचा आदेश निर्गमीत केला आहे.याचसोबत विस व एकवीस आॅगष्ट रोजी जिवनावश्यक अंतर्गत मोडणा-या सेवा सकाळपासून दूपारी दोनच वाजेपर्यतच सुरू ठेवण्यात येणार आहेत.
गोंडपिपरी नगरात कोरोनाच्या शिरकावानंतर प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे कामाला लागली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे,तहसिलदार सिमा गजभीये ठाणेदार संदीप धोबे यांनी केले आहे.घराबाहेर पडल्यास दंडात्मक तथा फौजदारी कार्यवाही करण्यात येणार असल्याने येणारे चार दिवस नागरिकांनी आपआपल्या घरीच राहावे असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here