वंचित बहुजन आघाडी आर्णी च्या वतीने डफली बजाओ आंदोलन एस.टी. सेवा सुरळीत करण्याची मागणी

0
362

वंचित बहुजन आघाडी आर्णी च्या वतीने डफली बजाओ आंदोलन एस.टी. सेवा सुरळीत करण्याची मागणी

यवतमाळ जिल्हा
आर्णी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने एसटी सेवा व इतर छोट्या व्यावसायिकांना प्रतिबंध केल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. त्यामुळे सुरक्षिततेची खबरदारी घेऊन तात्काळ एसटी सेवा सुरू करावी ही मागणी घेऊन प्रशासनाला जागे करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आर्णी तालुक्याच्या वतीने बस स्थानक परिसरात डफळी वाजवा आंदोलन करण्यात आले. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या. मात्र या उपाय योजना करताना सामान्य नागरिकांना, छोट्या व्यावसायिकांना डोळ्या समोर ठेवून करण्यात आल्या नसल्याने सामान्य जनतेचे मात्र यामुळे कंबरडे मोडल्या गेले. एकीकडे खाजगी वाहनांना वाहतुकीसाठी हिरवा कंदील देऊन सरकारी एसटी सेवेला मात्र लाल कंदील दाखविल्याने खाजगी वाहतुकीचे दर अस्मानाला भिडले आहे. यामुळे शेतकऱ्यांची, मजुरांची व सामान्य जनतेची आर्थिक होरपड होत आहे. यामुळे राज्यातील एसटी बस सेवा संपूर्ण सुरक्षिततेची खबरदारी घेऊन तात्काळ सुरू करण्यात यावी, तसेच तालुक्यातील पान सेंटर व इतर छोट्या विक्रेत्यांना व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी या मागणी साठी वंचित बहुजन आघाडी आर्णी तालुक्याच्या वतीने बस स्थानक आर्णी येथे डफळी वाजवा आंदोलन करण्यात आले. तसेच वरील मागणी बाबतचे निवेदन तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष गणेश हिरोळे, संदेश भगत, मायाताई मानकर, प्रशिक मुनेश्वर, कमलेश खरतडे, चेतन इंगळे, सुजित पाटील, योगेश भगत, रवी लढे, सुधाकर गवई, सुमेध वानखडे, सचिन भगत, वीरेंद्र पाईकराव, सुनील भगत, कपिल भगत, मिलींद मनवर, निलेश वानखडे, लक्ष्मीबाई मुनेश्वर, नंदा मानकर,
चित्रा खरतडे इत्यादी वंचित आघाडीचे कार्यकर्ते व पान व पान मसाला विक्री असोसिएशन चे अध्यक्ष रब शेख व सचिव उमेश घायवट उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here