मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या वाढदिवस सप्ताहाच्या निमित्त महिलांना साडीचोळी वाटप

0
415

मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या वाढदिवस सप्ताहाच्या निमित्त महिलांना साडीचोळी वाटप

 

जिल्हा विशेष प्रतिनिधी ✍🏻जीवन भोसले

मो. 9422811817

 

लातूर/उदगीर: नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्र मंडळाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उदगीर नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या वाढदिवस सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी नवनाथ गायकवाड मित्र मंडळाचे संस्थापक नवनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर नगर परिषदेतील सेविका महिला कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या सुविद्य पत्नी सौ.सुमन राठोड यांच्या शुभ हस्ते साडी-चोळी वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी विशाल राठोड, त्यांच्या सुविद्य पत्नी मीनाक्षी विशाल राठोड, मातोश्री पार्वती राठोड, नवनाथ गायकवाड, प्रा. पुष्पा नवनाथ गायकवाड, कुमारी साक्षी गायकवाड, अजमत खान, शरद शिंदे, सिद्धार्थ सूर्यवंशी, गिरीष स्वामी, मनीष मुळे इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here