सोनेगाव शाळेत मर्जीतील महिलेची स्वयंपाकी म्हणून निवड

0
428

सोनेगाव शाळेत मर्जीतील महिलेची स्वयंपाकी म्हणून निवड

 मुख्याध्यापिकेचा मनमानी कारभार

 अर्जदार महिलांचा आरोप

तालुका प्रतिनिधी
चिमूर.

तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनेगाव( वन) येथे शालेय पोषण आहार बनविन्याकरिता स्वयंपाकी व मदतनीस यांची नेमणूक मुख्यध्यापिका व एका सहायक शिक्षकाने आर्थिक देवाणघेवाण करून केल्याचा आरोप संवर्ग विकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतुन इतर अजर्दार महिलांनी केला आहे.

पंचायत समिती चिमूर अंतर्गत येत असलेल्या सोनेगाव(वन) जि. प.शाळेच्या वतीने शालेय पोषण आहार बनविण्याकरिता स्वयंपाकी व मदतनीस या साठी शाळा व्यवस्थापन समितीने जाहिरात प्रसिध्द करून गावातील महिलांचे अर्ज मागविले होते. या बाबत गावातील एकूण अकरा अर्ज प्राप्त झाले होते.अर्ज जास्त प्रमाणात आल्यामुळे निवड लकी ड्रॉ पध्दतीने करण्यात ठरविण्यात आले होते.
३० आगस्ट ला शाळा व्यवस्थापन समिती व शालेय कर्मचाऱ्याची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अर्जदार महिला उपस्थित झाल्या होत्या तर मुख्यध्यपिका व एका सहायक शिक्षकाने ही सभा निवडीसाठी नसल्याचे सांगून परत पाठविले व त्याच्या दिवशी शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी यांनी लकी ड्रॉ पद्धतीने करण्याच्या सूचना केल्या असता एक सहायक शिक्षक व मुख्याध्यापिका यांनी त्यांच्या सूचनेला बगल देऊन गावातील एका विशिष्ट महिलेचे नाव सातत्याने घेत त्याच महिलेची निवड करण्याच जाहीर केलं.
कोणत्याही अर्जदाराच्या समक्ष ही निवड न करता मर्जीतील महिलांची निवड करण्यात आल्याने हा प्रकार इतर महिलांना माहीत होतच त्यांनी मुख्याध्यापिका व सहायक शिक्षकाने आर्थिक देवाण घेवाण करून त्यांची निवड केली असल्याचा आरोप इतर महिला अर्जदारांनी केला या प्रकारात स्मबधित विभागाने त्वरित लक्ष घालून नव्याने निवड करावी व दोषींवर कारवाइ करावी अशी मागणी पंचायत समिती चिमूर चे संवर्ग विकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रारी मधून इतर अजर्दार महिला व ग्रामस्थांनि केली आहे.या बाबत प्रतिक्रिया मिळवण्यासाठी संबधित शाळेच्या मुख्याध्यापिका खोडे यांचेशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

सभेच्या दिवशी आम्हाला वापस पाठवून एका विशिष्ट महिलेला सभेत बोलावून तिची नियनबाह्य रित्या निवड करण्यात आली. यात आर्थिक देवाण घेवाण करून योग्य लाभार्थ्यांना डावलण्यात आले आहे ही निवड रद्द करून दोषींवर कारवाई व्हावी.
– दुर्गा नन्नावरे
ग्रामपंचायत सदस्य सोनेगाव(वन)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here