एरंडोल येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर अपघातात युवक ठार…

0
425

 

जळगाव जिल्हा प्रतिनिधी/प्रमोद चौधरी :- येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील हॉटेल पांडव जवळ एरंडोल कडून पारोळ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने समोरुन येणाऱ्या मोटासायकलस्वारास धडक दिल्याने मोटासायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी ठीक साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की दि.१० जुन रोजी धरणगाव तालुक्यातील बोरगाव येथील अनिल ज्ञानेश्वर मराठे (वय २२) हा तरुण आपली दुचाकी क्र.एम.एच.१९ डी.आर.३९४९ ने भालगाव मार्गे एरंडोल येथे शेतीसाठी बियाणे खरेदी करण्यासाठी येत होता.त्याच्या दुचाकीला एरंडोल कडून येणाऱ्या ट्रक क्र.एम.पी.२० एच.बी.६०३९ वरील चालकाने भरधाव ट्रक चालवत समोरुन जोरदार धडक दिली.या धडकेत अनिल हा ट्रकच्या पुढील चाकात आल्याने काही अंतर फरफटत गेला.त्याला मागुन येणाऱ्या अनीलचा चुलत भाऊ किशोर मराठे व महेश मराठे यांनी जवळ जावून बघितले असता तो काही एक हालचाल करीत नव्हता.त्याच्या डोक्याला व चेहऱ्यावर जबर मार लागून रक्त निघत होते.त्यावेळी किशोर मराठे व महेश मराठे यांनी लोकांच्या मदतीने एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.त्यास डॉक्टरांनी मयत घोषित केले.

घटनेचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे, जितेंद्र तायडे, संतोष चौधरी, विकास खैरनार व पंकज पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले व वाहतूक सुरळीत केली. दरम्यान अपघातग्रस्त ट्रक पोलिस स्टेशन ला जमा करण्यात आला आहे माञ ट्रकचालक पसार झाला आहे. याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशन ला ट्रकचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here